चिखली येथे मिनी बसचा ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधनाने टळला अनर्थ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st April, 11:32 pm
चिखली येथे मिनी बसचा ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधनाने टळला अनर्थ

वास्को : चिखली येथे बुधवारी सायंकाळी एका मिनी बसचा ब्रेक फेल झाल्यावर बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला. बस चिखली चौकातील वाहतूक बेटाला धडकल्याने त्या वाहतूक बेटाच्या लोखंडी रॅलिंगचे व बसच्या पुढील भागाचे किरकोळ नुकसान झाले. अपघातात एक दुचाकीचालक सुदैवाने बचावला. त्याच्या दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले.

मिनी बस वास्को ते बोगमाळो बीच मार्गावर प्रवाशी वाहतूक करते. सदर बस चिखली चौकापासून काही अंतरावर पोहचली असता, बसचे ब्रेक फेल झाल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्याने बस थांबविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्या बसची धडक एका दुचाकीला बसली. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर आडवी झाली. मात्र, दुचाकीचालक बचावला. त्यानंतर बस आणखी पुढे जाण्यापूर्वीच बसचालकाने ती वाहतूक बेटाच्या दिशेने नेली. बस त्या वाहतूक बेटावर आपटून तेथेच स्थिरावली. बस प्रवाशांनी गच्च भरली होती. सुदैवाने बस वाहतूक बेटाला धडकल्याने मोठा अनर्थ टळला. 

हेही वाचा