आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

३१ मेला अंतिम सामना : निवडणुकीच्या तारखांनंतर बीसीसीआयचा निर्णय

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th March, 11:33 pm
आयपीएल २०२६ च्या दुसऱ्या टप्प्यातील ५० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २६ मार्च रोजी आयपीएल २०२६ च्या उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केले आहे. देशातील विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे यापूर्वी केवळ पहिल्या २० सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता संपूर्ण वेळापत्रक समोर आले असून स्पर्धेचा दुसरा टप्पा १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे.
१३ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्याने होईल.आयपीएलमधील या दोन सर्वात यशस्वी संघांमधील पहिली लढत २३ एप्रिल रोजी मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. त्यानंतर २ मे रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर या दोन्ही संघांमधील परतीचा सामना खेळवला जाईल. २४ मे रोजी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने साखळी फेरीची सांगता होईल. २०२६ च्या हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जातील (७० साखळी सामने आणि ४ बाद फेरीचे सामने). दुसऱ्या टप्प्यात ८ ‘डबल हेडर्स’ (एकाच दिवशी दोन सामने) होणार आहेत. १८ एप्रिल रोजी पहिला डबल हेडर खेळवला जाईल.
गतविजेता आरसीबी संघ त्यांचे दोन घरचे सामने रायपूर येथे खेळणार आहे (१० मे - विरुद्ध मुंबई, १३ मे - विरुद्ध केकेआर). पंजाबचे ३ सामने धर्मशाला येथे, तर ४ सामने मुल्लानपूर (न्यू चंदीगड) येथे होतील. राजस्थानचा संघ गुवाहाटीनंतर जयपूरमध्ये ४ सामने खेळण्यासाठी परतणार आहे. अंतिम सामना ३१ मे रोजी खेळवला जाईल. मैदानाची अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी, गतविजेत्या आरसीबीचे घरचे मैदान असलेल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर फायनल होण्याची दाट शक्यता आहे. बाद फेरीच्या सामन्यांच्या तारखा आणि ठिकाणे बीसीसीआय नंतर जाहीर करणार आहे.
उद्घाटन सोहळा रद्द
बंगळुरू येथे मागील वर्षी झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीच्या घटनेतील मृतांना श्रद्धांजली म्हणून यावर्षी आयपीएलचा उद्घाटन सोहळा आयोजित केला जाणार नाही. २८ मार्च रोजी आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने हंगामाची सुरुवात होईल.
आयपीएल २०२६ संपूर्ण सामन्यांचे वेळापत्रक
२८ मार्च शनिवार आरसीबी वि. सनरायझर्स हैदराबाद ७.३० वा. बंगळुरू
२९ मार्च रविवार मुंबई इंडियन्स वि. केकेआर ७:३० वा. मुंबई
३० मार्च सोमवार राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा.गुवाहाटी
३१ मार्च मंगळवार पंजाब किंग्स वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. मुल्लानपूर
१ एप्रिल बुधवार लखनौ सुपर जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. लखनाै
२ एप्रिल गुरुवार केकेआर वि. सनरायझर्स हैदराबाद ७:३० वा. कोलकाता
३ एप्रिल शुक्रवार चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स ७:३० वा. चेन्नई
४ एप्रिल शनिवार दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स ३:३० वा. दिल्ली
४ एप्रिल शनिवार गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स ७:३० वा. अहमदाबाद
५ एप्रिल रविवार सनरायझर्स हैदराबाद वि. लखनौ सुपर जायंट्स ३:३० वा. हैदराबाद
५ एप्रिल रविवार आरसीबी वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा. बंगळुरू
६ एप्रिल सोमवार केकेआर वि. पंजाब किंग्स ७:३० वा. कोलकाता
७ एप्रिल मंगळवार राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. गुवाहाटी
८ एप्रिल बुधवार दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. दिल्ली
९ एप्रिल गुरुवार केकेआर वि. लखनौ सुपर जायंट्स ७:३० वा. कोलकाता
१० एप्रिल शुक्रवार राजस्थान रॉयल्स वि. आरसीबी ७:३० वा. गुवाहाटी
११ एप्रिल शनिवार पंजाब किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद ३:३० वा. मुल्लानपूर
११ एप्रिल शनिवार चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. चेन्नई
१२ एप्रिल रविवार लखनौ सुपर जायंट्स वि. गुजरात टायटन्स ३:३० वा. लखनौ
१२ एप्रिल रविवार मुंबई इंडियन्स वि. आरसीबी ७:३० वा. मुंबई
१३ एप्रिल सोमवार सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स ७:३० वा. हैदराबाद
१४ एप्रिल मंगळवार चेन्नई सुपर किंग्स वि. केकेआर ७:३० वा. चेन्नई
१५ एप्रिल बुधवार आरसीबी वि. लखनौ सुपर जायंट्स ७:३० वा. बंगळुरू
१६ एप्रिल गुरुवार मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स ७:३० वा. मुंबई
१७ एप्रिल शुक्रवार गुजरात टायटन्स वि. केकेआर ७:३० वा. अहमदाबाद
१८ एप्रिल शनिवार आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स ३:३० वा. बंगळुरू
१८ एप्रिल शनिवार सनरायझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा. हैदराबाद
१९ एप्रिल रविवार केकेआर वि. राजस्थान रॉयल्स ३:३० वा. कोलकाता
१९ एप्रिल रविवार पंजाब किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स ७:३० वा. न्यू चंदीगड
२० एप्रिल सोमवार गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. अहमदाबाद
२१ एप्रिल मंगळवार सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. हैदराबाद
२२ एप्रिल बुधवार लखनौ सुपर जायंट्स वि. राजस्थान रॉयल्स ७:३० वा. लखनौ
२३ एप्रिल गुरुवार मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा. मुंबई
२४ एप्रिल शुक्रवार आरसीबी वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. बंगळुरू
२५ एप्रिल शनिवार दिल्ली कॅपिटल्स वि. पंजाब किंग्स ३:३० वा. दिल्ली
२५ एप्रिल शनिवार राजस्थान रॉयल्स वि. सनरायझर्स हैदराबाद ७:३० वा. जयपूर
२६ एप्रिल रविवार गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स ३:३० वा.अहमदाबाद
२६ एप्रिल रविवार लखनौ सुपर जायंट्स वि. केकेआर ७:३० वा. लखनाै
२७ एप्रिल सोमवार दिल्ली कॅपिटल्स वि. आरसीबी ७:३० वा. दिल्ली
२८ एप्रिल मंगळवार पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स ७:३० वा.न्यू चंदीगड
२९ एप्रिल बुधवार मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद ७:३० वा. मुंबई
३० एप्रिल गुरुवार गुजरात टायटन्स वि. आरसीबी ७:३० वा.अहमदाबाद
१ मे शुक्रवार राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. जयपूर
२ मे शनिवार चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. चेन्नई
३ मे रविवार सनरायझर्स हैदराबाद वि. केकेआर ३:३० वा. हैदराबाद
३ मे रविवार गुजरात टायटन्स वि. पंजाब किंग्स ७:३० वा.अहमदाबाद
४ मे सोमवार मुंबई इंडियन्स वि. लखनाै सुपर जायंट्स ७:३० वा. मुंबई
५ मे मंगळवार दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा. दिल्ली
६ मे बुधवार सनरायझर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्स ७:३० वा. हैदराबाद
७ मे गुरुवार लखनौ सुपर जायंट्स वि. आरसीबी ७:३० वा. लखनौ
८ मे शुक्रवार दिल्ली कॅपिटल्स वि. केकेआर ७:३० वा. दिल्ली
९ मे शनिवार राजस्थान रॉयल्स वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. जयपूर
१० मे रविवार चेन्नई सुपर किंग्स वि. लखनौ सुपर जायंट्स ३:३० वा. चेन्नई
१० मे रविवार आरसीबी वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. रायपूर
११ मे सोमवार पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. धर्मशाला
१२ मे मंगळवार गुजरात टायटन्स वि. सनरायझर्स हैदराबाद ७:३० वा. अहमदाबाद
१३ मे बुधवार आरसीबी वि. केकेआर ७:३० वा. रायपूर
१४ मे गुरुवार पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. धर्मशाला
१५ मे शुक्रवार लखनौ सुपर जायंट्स वि. चेन्नई सुपर किंग्स ७:३० वा. लखनौ
१६ मे शनिवार केकेआर वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. कोलकाता
१७ मे रविवार पंजाब किंग्स वि. आरसीबी ३:३० वा. धर्मशाला
१७ मे रविवार दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स ७:३० वा. दिल्ली
१८ मे सोमवार चेन्नई सुपर किंग्स वि. सनरायझर्स हैदराबाद ७:३० वा. चेन्नई
१९ मे मंगळवार राजस्थान रॉयल्स वि. लखनौ सुपर जायंट्स ७:३० वा. जयपूर
२० मे बुधवार केकेआर वि. मुंबई इंडियन्स ७:३० वा. कोलकाता
२१ मे गुरुवार चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स ७:३० वा. चेन्नई
२२ मे शुक्रवार सनरायझर्स हैदराबाद वि. आरसीबी ७:३० वा. हैदराबाद
२३ मे शनिवार लखनौ सुपर जायंट्स वि. पंजाब किंग्स ७:३० वा. लखनौ
२४ मे रविवार मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स ३:३० वा. मुंबई
२४ मे रविवार केकेआर वि. दिल्ली कॅपिटल्स ७:३० वा. कोलकाता
३१ मे रविवार अंतिम सामना ७.३० वा.
नोंद: प्लेऑफ आणि फायनलचे वेळापत्रक बीसीसीआय नंतर जाहीर करेल. अंतिम सामना ३१ मे २०२६ रोजी होणार आहे.