भरधाव दुचाकीस्वराची धडक; दोन अभियंत्यांसह दुचाकीस्वार जखमी

सक्राळ-पत्रादेवी येथे अपघात : टाेलनाक्याच्या कामाची सुरू होती पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27 mins ago
भरधाव दुचाकीस्वराची धडक; दोन अभियंत्यांसह दुचाकीस्वार जखमी

पेडणे : सक्राळ-पत्रादेवी येथील टोलनाक्याच्या कामाची पाहणी करणाऱ्या दोन अभियंत्यांना सुसाट वेगाने आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. २३ मार्च रोजी सायंकाळी घडलेल्या या भीषण अपघातात अभियंत्यांसह दुचाकीस्वार असे एकूण तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
सावंतवाडी येथील गोविंद नाईक हा तरुण आपल्या दुचाकीवरून पेडणे मार्गे वेगाने जात असताना, टोलनाक्यावर कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता रोहन कळंगुटकर आणि गौतम तारी यांना त्याने समोरासमोर धडक दिली. या धडकेत दुचाकीचा चेंदामेंदा झाला असून जखमींना तात्काळ आपत्कालीन रुग्णवाहिकेने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग ६६ वर टोलनाक्याचे काम युद्धपातळीवर सुरू असूनही या ठिकाणी दिशादर्शक फलक किंवा बॅरिकेड्स नसल्याचे समोर आले आहे. येथे सुरक्षिततेची कोणतीही सोय नाही. सरकारने लवकरात लवकर या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करावेत, अशी मागणी तोरसेचे माजी सरपंच सूर्यकांत तोरस्कर यांनी केली आहे.

हेही वाचा