मांस पुरवठ्याच्या नावाखाली १.१४ लाखांची फसवणूक

मुंबईच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st March, 11:41 pm
मांस पुरवठ्याच्या नावाखाली १.१४ लाखांची फसवणूक

​मडगाव : ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. ‘इंडिया मार्ट’ या वेबसाइटवर मांस पुरवठादार असल्याचे सांगून मडगाव येथील एका रहिवाशाची १ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी मुंबईतील संशयिताविरोधात गुन्हा दाखल केला.

​ ​याप्रकरणी इस्माईल मुन्शी (रा. आके, मडगाव) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार, संशयित आरोपी मजहर आलम शेख (रा. मुंबई, महाराष्ट्र) याने मांस पुरवठादार असल्याचे इंडिया मार्ट या वेबसाइटवर भासवले होते. ​१६ ते १९ जून २०२५ या कालावधीत, संशयिताने तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. म्हशीचे मांस पुरवठा करण्याच्या बहाण्याने त्याने तक्रारदाराला यूपीआयद्वारे तीन वेगवेगळ्या व्यवहारांतून एकूण १.१४ लाख रुपये पाठवण्यास सांगितले.

​पैसे मिळाल्यानंतरही संशयिताने कराराप्रमाणे मांसाचा पुरवठा केला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इस्माईल मुन्शी यांनी मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. ​मडगाव पोलिसांनी याप्रकरणी संशयित मजहर आलम शेख याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. 

हेही वाचा