प्रवाशांना सतर्कतेचा इशारा

पणजी : इराण (Iran), अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) युद्धाची तीव्रता वाढत आहे व अनेक सेवांना त्याचा फटका बसू लागला आहे. विमान सेवेलाही त्याचा जबर फटका बसला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गल्फ एअर (Gulf Air) या विमान कंपनीची दाबोळी विमानतळ (गोवा) (Dabolim Airport,Goa) येथून ये-जा करणारी सर्व उड्डाणे २६ मार्च पर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
तसेच एअर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) यांच्या दुबई-गोवा मार्गावरील उड्डाणे २८ मार्च पर्यंत रद्द राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी आपापल्या विमान कंपनीशी संपर्क साधून अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी उड्डाणांच्या स्थितीची खात्री करूनच पुढील निर्णय घ्यावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.