यंत्रासारखं जगणं अन् एकमेकांसाठी झुरणं.. लंडनमधील या वर्किंग कपलची केवळ स्टेशनवर होते भेट

पाउंड्स कमावण्याच्या नादात हक्काच्या माणसांपासून दुरावलेल्या एका भारतीय मिलेनियल कपलची व्यथा सोशल मीडियावर तूफान व्हायरल.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19 mins ago
यंत्रासारखं जगणं अन् एकमेकांसाठी झुरणं.. लंडनमधील या वर्किंग कपलची केवळ स्टेशनवर होते भेट

लंडन/मुंबई: परदेशात जाऊन स्थायिक होणे, डॉलर्स किंवा पाउंड्समध्ये कमाई करणे याच बरोबर एक स्वतंत्र आणि आलिशान आयुष्य जगणे, हे आजही अनेक भारतीय तरुणांचे स्वप्न असते. सोशल मीडियावरील चकाचक फोटो आणि 'रील' पाहून अनेकांना परदेशातील लाईफस्टाईलची ओढ लागते. मात्र, या चकाकीच्या पडद्यामागे संघर्षाची एक काळी बाजूही दडलेली असते. लंडनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय दाम्पत्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या पती-पत्नीची व्यथा ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे, कारण या दोघांची भेट हक्काच्या घरात नाही, तर चक्क  रेल्वे स्टेशनवर अवघ्या काही मिनिटांसाठी होते.


लंदन में जॉब का स्ट्रगल: शिफ्ट ऐसी कि सिर्फ स्टेशन पर हो पाती है पति-पत्नी  की मुलाकात, वीडियो वायरल - indian couple living in london have to meet at  station because of


'रील' विरुद्ध 'रिअल' लाईफचा संघर्ष

झेबा सैफी नावाची एक भारतीय महिला, जी जुलै २०२५ मध्ये आपल्या पतीसह उज्वल भविष्याच्या आशेने युनायटेड किंगडममध्ये स्थायिक झाली. तिने अलीकडेच इन्स्टाग्रामवर आपल्या दैनंदिन आयुष्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने 'रील लाईफ व्हर्सेस रिअल लाईफ इन युके' असे शीर्षक दिले आहे. झेबा आणि तिच्या पतीच्या कामाच्या वेळा (शिफ्ट्स) इतक्या टोकाच्या आहेत की, त्यांना घरात एकत्र बसून साहावा चहा पिणे किंवा दहा मिनिटे निवांत गप्पा मारणेही दुरापास्त झाले आहे. वाढती महागाई आणि परदेशातील राहणीमानाचा खर्च पेलण्यासाठी दोघांनाही कठोर परिश्रम करावे लागत आहेत, पण या ओढाताणीत त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र कोमेजून गेले आहे.




स्टेशनवरची ती काही मिनिटे...

या दाम्पत्याची भेट नेमकी कधी होते? जेव्हा झेबा आपली दिवसाची शिफ्ट करण्यासाठी घराबाहेर पडते, त्याच वेळी तिचे पती रात्रपाळी संपवून घरी परतत असतात. वाटेत असलेल्या रेल्वे स्टेशनवर हे दोघे एकमेकांना भेटतात. एक ट्रेनमधून उतरत असतो, तर दुसरा ट्रेन पकडण्याच्या घाईत असतो. स्टेशनच्या फलाटावर होणारी ही काही मिनिटांची भेटच त्यांच्या संपूर्ण दिवसाची एकमेव शिदोरी असते. घरी पोहचेपर्यंत एक जण झोपलेला असतो, तर दुसरा कामावर गेलेला असतो. ही केवळ एका जोडप्याची कथा नसून, परदेशात स्थायिक झालेल्या अनेक 'वर्किंग कपल्स'चे हे वास्तव आहे. घर असूनही तिथे सोबतीला जोडीदार नसणे आणि केवळ कामाच्या यंत्रासारखे जगणे, ही आजच्या काळातील मोठी शोकांतिका बनली आहे.


लंदन में जॉब का स्ट्रगल: शिफ्ट ऐसी कि सिर्फ स्टेशन पर हो पाती है पति-पत्नी  की मुलाकात, वीडियो वायरल - indian couple living in london have to meet at  station because of


सोशल मीडियावरील प्रतिक्रिया आणि वास्तव

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्यांना नोकरी बदलण्याचा सल्ला दिला आहे, तर काहींनी त्यांच्या या संघर्षाला सलाम केला आहे. पैसा येतो, पण गेलेली वेळ आणि हरवलेले क्षण परत येत नाहीत, अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या आहेत. आजच्या धावपळीच्या युगात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यातच परदेशातील स्पर्धात्मक वातावरणामुळे माणसाला स्वत:च्या कुटुंबासाठीही वेळ काढता येत नाही. अनेकदा वृद्ध आई-वडील आपल्या मुलांच्या भेटीसाठी व्याकुळ असतात, पण ही मुले कामाच्या चक्रव्यूहात अशी अडकलेली असतात की त्यांना मायदेशी येणेही शक्य होत नाही.

त्यांची गुंतवणूक की पैशांची ओढ?

झेबा आणि तिच्या पतीची ही कहाणी आपल्याला अंतर्मुख करायला लावते. स्वप्नांच्या मागे धावताना आपण नेमके काय मिळवत आहोत आणि काय गमावत आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. पैसा ही गरज असली तरी, नात्यांमधील संवाद आणि सहवास ही मनाची भूक असते. लंडनमधील या भारतीय दाम्पत्याने शेअर केलेला हा अनुभव म्हणजे केवळ एक व्हिडिओ नसून, आधुनिक जीवनशैलीतील एकाकीपणाचा आरसा आहे. कष्ट आणि जिद्द नक्कीच महत्त्वाची आहे, पण या प्रवासात आपली माणसे मागे सुटणार नाहीत, याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. अखेर, हक्काचे घर तेव्हाच बनते जेव्हा तिथे बोलणारी आणि ऐकणारी माणसे एकत्र असतात.

हेही वाचा