चिकन लिव्हर चिली

Story: चमचमीत रविवार |
14th February, 10:40 pm
चिकन लिव्हर चिली

साहित्य

​पाव किलो चिकनचे लिव्हर

​२ चमचे आले-लसूण पेस्ट

​कोथिंबीर पेस्ट

​लिंबूरस

​५-६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून)

​२ सिमला मिरची (उभे काप करून)

​१ कांदा (मोठे तुकडे करून)

​अर्धा वाटी कांद्याची पात

​१ चमचा सोया सॉस

​तेल

​चवीनुसार मीठ

​१ चमचा गरम मसाला


कृती

​चिकनच्या लिव्हरला आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट व लिंबूरस लावून अर्धा तास मॅरीनेट करत ठेवा.

​पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या परतून घ्या.

​आता त्यात मॅरीनेट केलेले लिव्हर घालून शिजू द्या. थोडेसे पाणी घाला.

​त्यातील पाणी आटल्यावर त्यात कांदा, सिमला मिरची व चिरलेली कांद्याची पात घालून परता.

​त्यात सोया सॉस व मीठ घालून एक वाफ येऊ द्या.

​चिकन लिव्हर चिली गरमागरम सर्व्ह करा.


- शिल्पा रामचंद्र, मांद्रे