बेसिक तयारी याला फाउंडेशन असे म्हणतात. यात कोणत्याही अभ्यासाचा गाभा काय आहे, हे समजून घेता येते. सिव्हिल सर्व्हिसेससाठी UPSC ची तयारी करताना काय काय वाचावे, असा गोंधळ हमखास उडतो. कोणत्याही प्रश्नाला उत्तर असते. त्याचप्रमाणे अगदी सोप्या भाषेत उत्तर दर्शविणारे साहित्य निवडणे आवश्यक असते.
इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या अभ्यासाची जी शालेय पुस्तके आहेत, ती पूर्णपणे वाचून समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आठ महिन्यांमध्ये ही सर्व पुस्तके वाचून संपवता येतात. त्यावर नोट्स काढायच्या असतात. NCERT यांनी प्रमाणित केलेली पुस्तके या परीक्षांसाठी ग्राह्य धरली जातात.
भाषेची आणि गणिताची पुस्तके शालेय स्तरावरील असावीत. सुरुवातीला इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि विज्ञान ही पुस्तके वाचावीत. या पुस्तकांमध्ये आतील टिपणे, चित्रे, उदाहरणे दिलेली असतात. दररोज सोपे व पटकन लक्षात येईल अशा पद्धतीने विषयांची मांडणी त्यात केलेली असते. विषय एकदा नीट समजला, तर पुढे त्या विषयावरील तपशील वाचताना फार फायदा होतो.
आजपर्यंत UPSC/GPSC मध्ये टॉप केलेल्या विद्यार्थ्यांनी या विषयांवर भर दिलेला आहे. या इयत्ता पाचवी ते दहावीच्या विषयांच्या अभ्यासाला आपण 'फाउंडेशन' असे म्हणू शकतो.
हे विषय संपल्यानंतर आपण गणित हा विषय शिकू शकतो; कारण त्याला थोड्या सरावाची गरज असते. यात कसावी, मानसिक पायथागोरसची प्रमेये लक्षात ठेवावीत. MKS, CGS हे प्रकार समजून घ्यावेत. काही गणितात कन्व्हर्जन करावे लागते. उदाहरणार्थ, किलोमीटर प्रति तास याचे मीटर प्रति सेकंदमध्ये रूपांतर करावे लागते.
प्रश्न सोडवताना 'कन्व्हर्ट' करावे लागते. यात सर्व गोष्टींचा अत्यंत बारकाईने अभ्यास केला, तर पुढे प्रिलिम परीक्षेतील GS-१ आणि GS-२ या परीक्षांचा फायदा होतो.
स्पीड, वेळ आणि वेग याचबरोबर वर्क अँड टाइम अँड पाइप्स असे प्रश्न आले, की ते सोडवण्याची पद्धत असते. UPSC, GPSC, Railway यांची प्राथमिक पात्रता परीक्षा पास करायची हीच तर पहिली पायरी असते. इतर विषय नंतर मागाहून येतात.
१. जनरल स्टडीज १ आणि जनरल स्टडीज २
या प्रिलिम परीक्षा प्रकारात मोडल्या जातात. फाउंडेशनच्या अभ्यास पद्धतीने या परीक्षा उत्तीर्ण होण्यात फायदा होतो.
फाउंडेशनची पुस्तके पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही अवांतर पुस्तकांना सुरुवातीला हात लावू नये. ती पुस्तके मागाहून वाचावीत. सहा महिन्यांमध्ये ही सर्व पुस्तके वाचून काढावीत.
प्रथम इतिहास आणि भूगोल एकत्र जोडून वाचन करावे. सनावळी, दिनांक व घटना या Chronological Order ने टेबल किंवा चार्ट पद्धतीने लिहाव्यात.
भूगोलाचा अभ्यास करताना शेजारी भारताचा आणि जगाचा नकाशा घेऊन बसल्यास पटकन लक्षात राहते. नकाशा अर्थात 'मॅप स्टडी' भूगोल आणि इतिहास विषयासाठी उपयोगी पडते.

अॅड. शैलेश कुलकर्णी, कुर्टी - फोंडा


