गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत (GSSC) विविध सरकारी विभागांतील २१९ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी फोंडा येथे विशेष मार्गदर्शन वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे.

गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे नुकत्याच काही सरकारी खात्यांसाठी परीक्षा घेण्यात येत आहेत. विविध पदे विविध विभागांसाठी भरली जाणार आहेत. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस विभागासाठी 'सर्चर' पोस्ट भरले जाणार आहे. डायरेक्टर ऑफ फिशरीज विभागासाठी असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ फिशरीज ही पोस्ट भरायची आहे. डिपार्टमेंट ऑफ मेट्रोलॉजीसाठी इन्स्पेक्टर पोस्ट भरायच्या आहेत. डायरेक्टर ऑफ माईन्स अँड जिओलॉजी विभागासाठी जुनियर जिओलॉजिस्ट पोस्ट भरायच्या आहेत. पीडब्ल्यूडी विभागात असिस्टंट केमिस्ट पदे भरायची आहेत. अर्काईव्ह्ज विभागासाठी असिस्टंट आर्कीव्हिस्ट ग्रेड-२ या पोस्ट भरायच्या आहेत. दक्षिण जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पोस्ट भरायच्या आहेत. टुरिझम विभागासाठी इन्फॉर्मेशन असिस्टंट पदे भरायची आहेत. पीडब्ल्यूडी विभागासाठी लॅब टेक्निशिअन पोस्ट भरायच्या आहेत. डायरोक्टोरेट ऑफ इंडस्ट्रीज ट्रेड आणि कॉमर्स विभागासाठी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर पोस्ट भरायच्या आहेत.
डिपार्टमेंट ऑफ सिव्हिल सप्लाय या विभागासाठी इन्स्पेक्टर नेमणे आहेत. मोठ्या प्रमाणात लॅब टेक्निशिअन्स भरायचे आहेत. अॅग्रीकल्चर डिपार्टमेंटसाठी अॅनालिटिकल असिस्टंट नेमायचे आहेत. स्टोअर कीपर – गोडाऊन कीपर नेमायचे आहेत. इन्व्हेस्टिगेटर पदासाठी मोठ्या प्रमाणात भरती आहे. ट्रेझरर, अकाऊंट्स अकाऊंट क्लार्क, व्हिलेज पंचायत सेक्रेटरी, तलाठी एवढ्या पोस्ट भरल्या जाणार आहेत. एकूण २१९ पोस्ट भरायच्या आहेत. CBT-I आणि CBT-II या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
CBT-I परीक्षेसाठी २० मार्कांसाठी इंग्रजी, न्युमरिकल गणिते १५ मार्कांसाठी, रिझनिंगसाठी १५ मार्क तसेच कोकणीसाठी १० मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहेत. या सर्व पोस्टसाठी कोकणी येणे अत्यावश्यक आहे. अनेकदा मुलांना रिझनिंग अॅप्टिट्यूड आणि न्युमरिकल या प्रश्नांचे मार्गदर्शनच कुठे मिळत नाही. प्रत्येक प्रश्नाला सोडवण्याची काही टेक्निक्स असतात. मोबाईलवरील युट्यूबवरून प्रश्न कसे सोडवायचे ते दिलेले असते, बघताना असे वाटते की अरे - किती सोपे टेक्निक आहे. परंतु लागोपाठ ४ व्हिडिओ पाहिले की आधीचे सर्व विसरून जाते आणि काहीही कळत नाही.
स्पर्धा परीक्षांचे वाढते आव्हान आणि सरावाचे महत्त्व:
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ माहिती असणे पुरेसे नाही, तर ती माहिती वेळेत वापरणे महत्त्वाचे आहे. गणित आणि रिझनिंगसारख्या विषयांत 'स्पीड' आणि 'अॅक्युरसी' (अचूकता) हेच यशाचे गमक आहे. केवळ व्हिडिओ पाहून किंवा पुस्तके वाचून ही कौशल्ये आत्मसात करता येत नाहीत. त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकाची जोड आणि प्रत्यक्ष हाताने प्रश्न सोडवण्याचा सराव हवा. फोंडा येथील वर्गांत विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यावर भर दिला जातो, ज्यामुळे कठीण प्रश्नही सोपे वाटू लागतात.
त्यामुळे रोज नित्य सराव, वही-पेन घेऊन योग्य मार्गदर्शनाखाली किमान प्रत्येकाने २०-२० सराव प्रश्न सोडवले की मगच नीट अभ्यास होतो. गोव्यातील फोंडा कुर्टी या ठिकाणी हे मार्गदर्शन प्रिपरेटरी वर्ग सुरू झालेले आहेत. बरेच विद्यार्थी नीट क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन घेतात. यात जवळपास ७५% पोर्शन नीट शिकून होतो व मुख्य म्हणजे सराव, थोडक्यात केलेल्या चुकांचे मार्गदर्शन व वेळेत सोडवण्याचा सराव केला जातो. CBT-I आता जवळ आलेली आहे, त्यानंतर परत CBT-II असणार. विद्यार्थी, ७०५७९२५८५२ या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या सोडवू शकतात.
उज्वल भविष्याची संधी:
सरकारी नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. केवळ २१९ पदेच नव्हे, तर या येत्या वर्षात किमान २५०० शासकीय नोकऱ्या स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. या संधीचा लाभ घेण्यासाठी शिस्तबद्ध तयारी आणि योग्य वेळी घेतलेले मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरेल. विद्यार्थ्यांची शासकीय नोकरीची अभिलाषा पूर्ण होण्याची खूप शक्यता आहे.
अॅड. शैलेश कुलकर्णी,कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)