नारळ-खजूर बर्फी

Story: चमचमीत रविवार |
22nd August, 11:20 pm
नारळ-खजूर बर्फी

सगळ्या बहिणींचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हटलं की प्रत्येक भावाला "आज गोड काय असेल का?" असा प्रश्न मनात येतो. तर तुमच्या भावाला हा गोड पदार्थ नक्की करून द्या.

साहित्य : १ मोठी वाटी नारळाचे खोबरे अर्धी वाटी खजूर (बिया काढलेले) १ बारीक वाटी काजू-बदाम पावडर १ चमचा तूप २ चमचे दूध १ बारीक चमचा वेलची पूड १ चमचा साखर किंवा गूळ (आवडीनुसार) सजावटीसाठी पिस्त्याचे काप

कृती : एका कढईत १ चमचा तूप गरम करून त्यात खोबरे घाला. हे खोबरे साधारण ३ ते ४ मिनिटे मंद आचेवर परतून घ्या. मग त्यात दूध आणि साखर किंवा गूळ घालून ३–४ मिनिटे परतून घ्या. वेलची पूड घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा आणि बाजूला काढा. आता त्याच कढईत खजूर मऊ होईपर्यंत परतवा, त्यात काजू-बदाम पावडर घालून एकत्र मळून घ्या. खजुराचे मिश्रण एका पसरट भांड्यात पातळ पसरून घ्या. त्यावर नारळाचे मिश्रण पसरवा. १५ ते २० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून त्याचे चौकोनी तुकडे कापा. वरून पिस्त्याचे काप लावून सजवा.


- संचिता केळकर