साधारण १८४८ साली ब्रिटिश व्हाइसरॉय लॉर्ड डलहौसी यांनी सर्वप्रथम भारतामध्ये रेल्वे सुरू करावी असा प्रस्ताव ब्रिटिश पार्लमेंटकडे मांडला व त्यानंतर रेल्वेचा विस्तार भारतात झाला. त्यावेळी हजारो कोटी रुपये या योजनेसाठी देण्यात आले. ही रेल्वे भारतात कशी धावू लागली हा फारच रोचक इतिहास आहे. सुरुवातीला लोक ‘एक चेटक’ म्हणून रेल्वेगाडीला चक्क दगड मारत असत व नंतर त्याच रेल्वेमधून मिरवू लागले. अनेक जण या रेल्वे बांधणीमध्ये हुतात्मा सुद्धा झाले. बोगदे तयार करणे, पूल बांधणी या प्रकारात अनेक मोठे मोठे अपघात देखील झालेले आहेत. आपण आता सहजपणे रेल्वेतून प्रवास करतो, परंतु कित्येक जीवांच्या बलिदानाने आपण हे उपभोगत आहोत हे ध्यानात घेणे गरजेचे आहे. 'रेल्वे ही स्वातंत्र्यसंग्रामाची वरदायिनी' असे उद्गार त्यावेळी टिळकांनी काढलेले. याचे कारण असे होते की यामुळेच भारत देश एकमेकांच्या फार जवळ आला व त्याचा स्वातंत्र्यासाठी फायदा झाला. हा झाला इतिहासाचा भाग.
आजमितीस रेल्वे विभागामध्ये १५ लाख लोक काम करतात. दर महिन्याला हजारो तरुण रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाच्या परीक्षांना सामोरे जातात. कित्येक जण रेल्वेमध्ये काम सुरू करतात, तर रोज अनेक लोक रेल्वेमधून रिटायर देखील होत असतात.
भारत सरकारच्या अंतर्गत ‘रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड’ (RRB) ही संस्था रेल्वेमधील कर्मचारी भरतीचे काम बघते. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी २१ RRBs आहेत व त्याच्या त्याच्या विभागातील Employment Availability अनुसार उमेदवार निवडले जातात.
१० वी पासून Post Graduate पर्यंत शिकलेला कोणताही विद्यार्थी रेल्वे Join करू शकतो. मुख्यत्वे रेल्वे प्रशासन मूलभूतपणे ४ गोष्टींवर चालते:
१) Technical Section
२) Non-Technical Section
३) Finance / Accounts
४) Police
Technical Section मधील कर्मचारी अभियांत्रिकीचे कामे करतात - डबे बनवणे, इंजिन बनवणे, रेल्वे रुळांची कामे करणे, इलेक्ट्रिकल लोको शेड बनवणे, रेल्वे स्टेशन्स तयार करणे इत्यादी. यासाठी Diploma Holders सुद्धा मोठ्या प्रमाणात निवडले जातात. BE / B.Tech / Dip in Mech, Electrical, Civil, Automobile, Electronics / IT असे अनेक अभियंते येथे घेतले जातात.
Non-Technical विभागात तिकीट कलेक्शन सिस्टीम, लिगल, HR, पर्चेस, मटेरियल्स, डॉक्टर्स, नर्सेस, रेल्वे क्वार्टर्स योजना, Canteen इत्यादी Non-Technical कामांसाठी कर्मचारी निवडले जातात. BA, B.Com, B.Sc, B.Pharma, १० वी, १२ वी, Polytechnic Holders, ITI सर्व ट्रेडमधील उमेदवार घेतले जातात.
Finance / Accounts विभाग रेल्वे महसूल, भागभांडवल, Financial Bonds यांचे वितरण, निर्मिती व नियोजनाचा भाग बघतात. B.Com, M.Com, CA, CS, ICWA, LLB, LLM, Tax Consultant असे अनेक उमेदवार येथे काम करतात.
Police Force मध्ये Railway Protection Force (RPF) या विभागात संरक्षणासाठी उमेदवार निवडले जातात. १० वी पासून पदवीधरांपर्यंत कोणीही येथे काम करू शकतो.
RRB च्या प्रवेश परीक्षा असतात. परीक्षेसाठी १० वी ते General Science, Math तसेच Current Affairs, General Knowledge, General Aptitude असे विषय असतात. परीक्षा पास झालेले उमेदवार Interview मधून निवडले जातात. Employment News या वृत्तपत्रातून या परीक्षांच्या बातम्या सतत येत असतात. Railway Recruitment Board च्या अधिकृत वेबसाईटवरून वारंवार माहिती मिळत असते. गुगलवर सर्च केल्यास संपूर्ण माहिती मिळते.
केंद्र सरकारी नोकरी, पेन्शन, आकर्षक वेतन तसेच आगामी Metro Projects व आधुनिकीकरणामुळे एक Challenging तसेच भक्कम करिअर असे रेल्वेसंबंधी म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
– अॅड. शैलेश कुलकर्णी, फोंडा, गोवा – 7875445399, (लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)


