मेणकुरे-धुमासे ग्रामसभेत स्मशानभूमीच्या उद्घाटनावरून तुफान गदारोळ; ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की

डिचोली येथील मेणकुरे ग्रामसभेत स्थानिक स्मशानभूमीच्या मुद्द्यावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. चर्चेदरम्यान एकाने खुर्ची फेकण्याचाही प्रयत्न केला. इतरांनी त्यास अडवले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
54 mins ago
मेणकुरे-धुमासे ग्रामसभेत स्मशानभूमीच्या उद्घाटनावरून तुफान गदारोळ; ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्की

डिचोली: मेणकुरे-धुमासे ग्रामसभेत स्थानिक स्मशानभूमीच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. बैठकीदरम्यान वाद वाढल्याने ग्रामस्थांमध्ये धक्काबुक्कीची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला शांतपणे चर्चा सुरू होती. नंतर स्मशानभूमीच्या उद्घाटनाच्या प्रक्रियेवरून पंचायत प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये मतभेद निर्माण झाले. सदर स्मशानभूमीचे उद्घाटन आधीच अधिकृतपणे पार पडले असल्याचे स्पष्टीकरण पंचायत मंडळाकडून देण्यात आले. मात्र, ग्रामस्थांच्या एका गटाने पंचायतीच्या या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला.स्मशानभूमीचा उद्घाटन सोहळा पुन्हा एकदा रीतसर आयोजित करण्यात यावा, अशी मागणी या गटाने केली.

या मागणीवरून ग्रामसभेत जोरदार शाब्दिक चकमक उडाली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने वातावरणातील तणाव वाढला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. एकाने तर चक्क खुर्ची फेकण्याचा प्रयत्न केला. इतरांनी त्याला आवर घातला. या गोंधळामुळे ग्रामसभेचे कामकाज काही काळ विस्कळीत झाले. या वादावर पंचायत प्रशासन आता काय तोडगा काढते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


बातमी अपडेट होत आहे....

हेही वाचा
सर्व पहा
महत्वाच्या बातम्या
सर्व पहा