पंजाबमध्ये आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
39 mins ago
पंजाबमध्ये आप नेत्याची गोळ्या झाडून हत्या

जालंधर : पंजाबमधील (Punjab) जालंधरमधील (Jalandhar)मॉडेल टाउन परिसरातील गुरुद्वाराबाहेर आम आदमी पक्षाचे नेते लकी ओबेरॉय (AAP leader Lucky Oberoi)  यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात घबराट पसरली आहे आणि सुरक्षेची चिंता वाढली आहे.

ओबेरॉय यांच्यावर अनेक वेळा गोळीबार करण्यात आला आणि पाच गोळ्या लागल्या. त्यानंतर तत्काळ एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर, पोलिसांनी गुरुद्वारा भोवतीच्या परिसराला वेढा घातला आणि घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यास सुरूवात केली. पोलिसांनी गुरुद्वाराजवळील परिसर बंद केला असून, आजूबाजूचा परिसर, रस्त्यांवर तपासणी सुरू केली आहे. अधिकारी स्थानिक रहिवासी आणि दुकानदार यांच्याकडून माहिती घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करीत आहेत. हल्ल्यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही.

 ओबेरॉय यांच्या पत्नीने यापूर्वी आपच्या तिकिटावर नगरपालिका निवडणूक लढवली होती, तर ओबेरॉय स्वतः कॅन्ट मतदारसंघाचे प्रभारी राजविंदर कौर थियारा यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते.

हेही वाचा