सरपंच बनण्यात मुलांची अट ठरत होती अडसर; जन्मदात्या बापाने केला मुलीचा खून

निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात घडलेल्या घटनेने खळबळ

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
04th February, 10:27 am
सरपंच बनण्यात मुलांची अट ठरत होती अडसर; जन्मदात्या बापाने केला मुलीचा खून

नांदेड : सरपंच (Sarpanch) बनण्यास तिसरी मुलगी अडसर ठरत असल्याने जन्मदात्या बापाने (Father)  आपल्या मुलीचा खून (Canal) करण्याची चटका लावणारी घटना घडली. सरपंच होण्याच्या हव्यासाने पछाडलेल्या बाप्पाने आपल्या सहा वर्षांच्या मुलीला कॅनलच्या पाण्यात फेकून दिले. 

तेलंगणातील (Telangana) निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरा जवळील एका कॅनलमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आल्यावर एकूण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी वडील पांडुरंग कोंडामंगले याला मुखेड तालुक्यातील केरूर येथून अटक केली. 

अटक करण्यात आलेल्या पांडुरंग बाबूराव कोंडामंगले (३२ वर्षे, बारहाळी, मुखेड, केरुर) याने आपली ६ वर्षांची मुलगी प्राची हिला दोन दिवसांपूर्वी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर बसवून नेले. पत्नीला नांदेडला जातो असे सांगितले व तेलगंणा येथील कडपल्ली येथे जाऊन मुलीला कॅनलमध्ये फेकून दिले. सायंकाळी एकटाच घरी परतला. 

दरम्यान, स्थानिकांनी कॅनलमध्ये पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या मुलीला बाहेर काढून यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. मुखेड पोलिसांनी तत्काळ तपासाला गती देत पांडुरंग कोंडामंगले याला चौकशीसाठी बोलावून ताब्यात घेऊन पुढील प्रक्रिया केल्याची माहिती येडापल्ली पोलीस स्थानकाचे निरीक्षक लक्ष्मणराव केंद्रे यांनी दिली. सरपंच बनण्यासाठी तिसरी मुलगी अडसर ठरत असल्याने हा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. 

आपला राजकीय हव्यास पू्र्ण करण्यासाठी पोटच्या मुलीचा खून केलेल्या वडिलांना कठोर शिक्षा करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सरपंचाला ही अटक केली आहे. 

प्राची शिक्षणात होती हुशार

प्राची शिक्षणात हुशार होती व एक हुशार विद्यार्थीनी म्हणून शाळेत ओळखळी जात होती; अशी माहिती ती शिक्षण घेत असलेल्या महेश वंटेकर यांच्या इंग्रजी माध्यमातील शाळेतून मिळाली. एक होतकरू व हुशार विद्यार्थीनीचा अशा प्रकारे दुर्दैवी शेवट झाल्याचे सांगताना वंटेकर यांना गहिवरून आले. एकूण या प्रकाराबद्दल परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 


हेही वाचा