प्रसशासनाचे प्रसंगावधान; वेळीच संपूर्ण वस्ती खाली केल्याने टळली संभाव्य जीवितहानी.

मनिला : फिलिपिन्समध्ये (Philippines) आगीचे (Fire) तांडव पहायला मिळाले. दक्षिण फिलिपिन्समधील बोंगाओ येथे एका छोट्या बेटावर आगीचे रौद्ररुप पहायला मिळाले. त्यात सुमारे १ हजार घरे (One Thousand Houses) बेचिराख झाली तर हजारो लोक बेघर झाले. कित्येक तास आग सुरू होती. वारा व तत्सम कारणांमुळे आग वेगाने सर्वत्र फोफावत राहिली. त्यामुळे परिस्थिती एकदम हाताबाहेर गेली.
आगीच्या लोळांनी पूर्ण वस्तीला विळखा घातला व त्यात हजारो घरे पूर्णपणे बेचिराख झाली. मिळालेल्या माहितीनुसार; आग बारंगाय लामियन नावाच्या भागात प्रथम लागली व त्यानंतर पूर्ण बेटावर पसरली. या बेटावर घरे पाण्यात लाकडाचे खांब टाकून उभारण्यात आली आहेत. आणि घरांच्या बांधकामासाठी लाकूड, नारळाच्या झाडाच्या फांद्या व बांबू वापरण्यात आले आहेत. घरेही एकमेकांना लागून होती. त्यामुळे आग वेगाने सर्वत्र पसरली व त्यात १ हजार घरे जळून खाक झाली.
आग लागल्याची माहिती मिळताच येथील पूर्ण वस्ती खाली करण्यात आल्याने; सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील वस्तू, सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे अनेक लोक बेघर झाले आहेत व मोकळ्या ठिकाणी आसरा शोध घेत आहेत. पुढे काय हा प्रश्न कायमचा सतावत आहे. आगीचे भयाण वास्तव दाखवणारे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर व्हायरल होत आहेत.