बिट्स पिलानीतील युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा : अभाविप

पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
बिट्स पिलानीतील युवतीच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा : अभाविप

पणजी :  बिट्स पिलानीच्या गोवा कॅम्पसमधील (Bits Pilani Goa Campus)  वाढत्या आत्महत्यांसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) (ABVP)  गोवा (Goa) विभागाने चिंता व्यक्त केली असून, यासंदर्भात सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी पोलीस महानिरीक्षकांकडे (Inspector General of Police)  केली आहे. त्याचबरोबर शिक्षण संस्थेतील कॅम्पसमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर भर देण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. 

अभाविपतर्फे यासंदर्भातील एक निवेदन गोव्यातील पोलीस महानिरीक्षकांना देण्यात आले आहे. त्यात एकूण घडलेल्या आत्महत्या व एकूण स्थितीसंदर्भात चिंता व्यक्त करीत यापुढे असे प्रकार होऊ नयेत; यासाठी खबरदारी घेण्याची मागणी केली आहे. 

 २० वर्षीय युवतीने केलेली आत्महत्या व यापूर्वीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करून सखोल व निष्पक्ष चौकशी करावी. त्याचबरोबर कॅम्पस परिसरातील जवळच्या भागात पोलीस आऊट पोस्ट स्थापन करणे किंवा तत्सम उपाययोजना हाती घेणे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ पावले उचलता येणार. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी व मानसिक स्थिती बळकट रहावी, यासाठी सरकारी अधिकारिणीच्या समन्वयाने उपक्रम हाती घेणे. इत्यादी उपाय हाती घेण्याचे अभाविपतर्फे पोलीस महानिरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून सूचवण्यात आले आहे. 


हेही वाचा