भारतातून चोरीला गेलेल्या तीन मूर्ती अमेरिका भारताला परत करणार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
17 mins ago
भारतातून चोरीला गेलेल्या तीन मूर्ती अमेरिका भारताला परत करणार

 वॉशिंग्टन :  भारतातून (India) काही वर्षांपूर्वी चोरीला गेलेल्या १६ व्या शतकापूर्वीच्या असलेल्या तीन मूर्ती अमेरिका (America) भारताला परत करणार आहे. यासंदर्भात अमेरिकेचे नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट स्मिथ सोनियन इन्स्ट‌िट्यूशनने माहिती दिली आहे. या मूर्ती कांस्य धातूच्या आहेत.

या मूर्ती संग्रहालयात (Museum)  ठेवण्यात आल्या असून, ‘श‌िव नटराज’ (चोळकाळ, अंदाजे ९९०), ‘सोमस्कंद’ (चोळकाळ, १२ वे शतक) आणि ‘संत सुंदर’ विथ परावई’ (विजयनगर काळ, १६ वे शतक) यांच्या आहेत. दक्षिण भारतीय कांस्य कला परंपरेनुसार या सर्व मूर्ती बनविण्यात आल्या आहेत. तामीळनाडूतील (Tamil Nadu) मंदिरांमध्ये (Temple) धार्मिक मिरवणुकीदरम्यान या मूर्ती पूर्वी काढल्या जात होत्या. 

यातील चोळकालीन ‘शिव नटराज’मूर्ती भारत सरकारबरोबर झालेल्या करारानुसार अमेरिकेतच राहणार असल्याचे संग्रहालयातर्फे सांगण्यात आले. संग्रहालय करारानुसार ही मूर्ती प्रदर्श‌ित करीत राहील. मूर्ती परत मिळवण्याबद्दलची पूर्ण माहितीही सामायिक करण्यात येणार आहे. या मूर्ती स्थानिक तस्करांनी चोरून भारताबाहेर पोहोचवल्या होत्या. 



हेही वाचा