
मडगाव : गोव्यातील (Goa) कोलवा (Colva) येथे जमिनीच्या वादातून बेकायदेशीर जमाव करून कामगारांना धमकावण्यात आले. तसेच आर्किटेक्टला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी (Goa Police) संशयित आंतानियो रॉड्रिग्स याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शुभ्रांशू गुप्ता (रा. नोयडा, सध्या रा. कोलवा) यांच्या व्हिलाच्या स्वच्छतेचे काम मजूर करत असताना 30 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजता ही घटना घडली. संशयित आंतोनियो याने अन्य काही व्यक्तींसह बेकायदेशीर जमाव करत गुप्ता यांच्या मालमत्तेत प्रवेश केला. यावेळी संशयितांनी तेथे काम करणार्या मजुरांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत त्यांना काम करण्यापासून रोखले. याचवेळी तक्रारदार गुप्ता यांचे सहकारी तथा साईट आर्किटेक्ट अशित अग्रवाल यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, संशयित रॉड्रिग्स याने त्यांचा हात पिरगळून त्यांना शारीरिक दुखापत केली. मालमत्तेच्या पाठीमागील भागात जाण्याच्या रस्त्यावरून हा वाद झाला. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास केला जात आहे.