गोवा–बेळगाव चोर्ला मार्गावर ८०० किलो गोमांस जप्त; दोघांना अटक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
गोवा–बेळगाव चोर्ला मार्गावर ८०० किलो गोमांस जप्त; दोघांना अटक

वाळपई : गोवा–बेळगाव (Goa -Belgaum) दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरातून सुमारे ८०० किलो गोमांस (Beaf)  जप्त करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी (Police) दोन इनोव्हा (Innova car) जप्त केल्या आहेत तर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

या परिसरातून गोमांस वाहतुकीचे प्रकार अलीकडे वाढताना दिसत आहेत. गेल्या वर्षभरात या महामार्गावर चार वेळा गोमांस जप्तीच्या घटना घडल्या आहेत.  तरीही हे प्रकार थांबलेले नाहीत.

शनिवारी बजरंग दलाच्या (Bajrang Dal)  कार्यकर्त्यांच्या मदतीने वाळपई पोलिसांनी चोर्ला परिसरातून गोव्यात येत असलेले मोठ्या प्रमाणातील गोमांस जप्त केले. जप्त केलेल्या मांसाचे वजन सुमारे ८०० किलो असून, यासाठी पाच गायींची कत्तल करण्यात आल्याचा संशय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन इनोव्हा गाड्या ताब्यात घेतल्या असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती वाळपई पोलिसांनी दिली.


हेही वाचा