पाच वर्षांत ३७१ टक्के वाढ : सासष्टीतून १८८ कोटी रुपये

पणजी : मागील काही वर्षांत गोव्यात बांधकाम प्रकल्पांचे पेव फुटले असून, विशेषतः बार्देश आणि तिसवाडी तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. याचा थेट परिणाम सरकारी तिजोरीवर झाला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता मुद्रांक आणि नोंदणी शुल्कातून बार्देश तालुक्यातून तब्बल ५८५ कोटींचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. मागील पाच वर्षांतील कोणत्याही तालुक्याची ही सर्वाधिक कमाई ठरली आहे.
एका वर्षात बार्देशच्या महसुलात तब्बल ३७१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२०-२१ मध्ये बार्देशमधून १२५.४५ कोटींचा महसूल मिळाला होता, जो २०२४-२५ मध्ये ५८५ कोटींवर पोहोचला. चालू आर्थिक वर्षातही (१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२५) बार्देशने २९४ कोटी रुपयांच्या कमाईसह आपले वर्चस्व कायम राखले आहे.
| तालुका | महसूल (कोटी रुपयांत) |
|---|---|
| बार्देश | ५८५ |
| सासष्टी | १८८ |
| तिसवाडी | १७२ |
| मुरगाव | १५२ |
| पेडणे | ७१ |
| इतर (डिचोली, फोंडा इ.) | ६० पेक्षा कमी |
नगर नियोजन कायद्याच्या कलम ३९ (अ) अंतर्गत जमीन रूपांतरण शुल्क आणि प्रक्रिया शुल्कातून सरकारला मागील ३२ महिन्यांत ८४.५३ कोटी रुपये मिळाले आहेत. या प्रक्रियेतून दिवसाला सरासरी ८.६७ लाख रुपयांचा महसूल जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
२०२०-२१ पासून बार्देश तालुक्यातील मुद्रांक शुल्काचा आलेख सातत्याने उंचावत आहे: