नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीत गोवा देशात दुसरा

आसाम अव्वल, महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
31st January, 09:14 pm
नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या अंमलबजावणीत गोवा देशात दुसरा

पणजी : देशात लागू करण्यात आलेल्या नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या (बीएनएस, बीएनएसएस, बीएसए) अंमलबजावणीबाबत केंद्र सरकारने केलेल्या मूल्यांकनात गोव्याने बाजी मारली आहे. या मूल्यांकनात गोव्याने ७५.२५ गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

या यादीत आसाम राज्य पहिल्या क्रमांकावर असून, शेजारील महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. तुलनेने लहान राज्य असूनही गोव्याने देशपातळीवर मिळवलेले हे यश महत्त्वपूर्ण मानले जात आहे. डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर आणि केंद्र व राज्य यंत्रणांमधील समन्वयामुळे गोव्याची कामगिरी सरस ठरली आहे.

अंमलबजावणीत अग्रेसर राज्ये (गुण)

राज्य मिळालेले गुण
आसाम ८१.५४
गोवा ७५.२५
महाराष्ट्र ७३.७०
राजस्थान ७३.३०
अंदमान आणि निकोबार ६९.५६
हरियाणा ६८.९६

मूल्यांकनाचे चार प्रमुख निकष

या मूल्यांकनासाठी चार प्रमुख निकष निश्चित करण्यात आले होते. गोव्याने प्रशासनिक सुधारणांमध्ये २० पैकी पूर्ण २० गुण मिळवले आहेत. इतर निकषांमधील कामगिरी खालीलप्रमाणे आहे:

  • प्रशासनिक सुधारणा (२०%): नवीन कायद्यांनुसार प्रशासकीय बदल करणे.
  • कार्यात्मक कार्यक्षमता (४५%): गुन्ह्यांची नोंद, तपास आणि खटल्यांची प्रक्रिया.
  • आयसीटी वापर (२५%): डिजिटल प्रणाली आणि तंत्रज्ञानाचा वापर.
  • यंत्रणांमधील एकात्मता (१०%): विविध विभागांमधील माहितीचे एकत्रीकरण आणि समन्वय.
#GoaPolice #NewCriminalLaws #BNS #Assam #Maharashtra #GoaNews #HomeMinistry
हेही वाचा