भारतात पाच वर्षांत ५३ हवाई अपघातात ३२० जणांचा मृत्यू, १८० हून अधिक लोक जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर वाढत्या हवाई अपघातांचा प्रश्न ऐरणीवर; पाच वर्षांत अपघातांचे प्रमाण १४.२९ टक्क्यांनी वाढले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
27 mins ago
भारतात पाच वर्षांत ५३ हवाई अपघातात ३२० जणांचा मृत्यू, १८० हून अधिक लोक जखमी

नवी दिल्ली : भारतात (India)  गेल्या पाच वर्षांत (२०२० ते २०२५) ५३ हवाई अपघाताच्या (India suffered 53 air accidents ) घटना घडल्या असून, त्यात ३२० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला तर १८० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यत्री अजित (दादा) पवार (Ajit Pawar)  यांचे काल बारामती (Baramati) येथे विमान अपघातात निधन झाले. या घटनेने महाराष्ट्रासहीत (Maharashtra)  देशभर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर विमानांच्या वाढत्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  विमान प्रवासाविषयी लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना तयार होऊ लागली आहे. 

माहिती अधिकारातून हवाई अपघातांची माहिती पुढे आली आहे. त्यात २०२० ते २०२५ या दरम्यान ५३ अपघात झाले आहेत. त्यातील २० अपघातांमध्ये जिवीतहानी झाली आहे. पाच वर्षांत हवाई अपघातांचे प्रमाण १४.२९ टक्क्यांनी वाढले आहे. या घटनांमध्ये प्रशिक्षणासाठी घेतली जाणारे उड्डाणे, लहान विमाने, हेलिकॉप्टर, चार्टर्ड जेट यांचा समावेश आहे. 

खराब हवामानाचा फटका

विमानांचे लॅण्डिंग करताना हवामान चांगले असावे लागते. हवामान खराब असल्यास विमान धावपट्टीवर उतरवताना वैमानिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दृश्यमानता कमी असल्यास धावपट्टी दिसणे अवघड होते. अशा परिस्थितीत वैमानिकाला धावपट्टी दिसण्यात अडथळे येत असतात.  उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करीत असलेल्या अपघातग्रस्त विमानाचा वैमानिक याच कठीण परिस्थितीतून गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. बारामतीतील विमानतळ उंच भागात असून, अशा ठिकाणी विमानाचे लॅण्डिंग करणे मोठे आव्हान असते. ढगांमुळे वैमानिकाने धावपट्टी दिसण्याआधीच वैमानिकाने लॅण्डिंगचा प्रयत्न केला असावा व अंदाज चुकल्याने अपघात घडला असावा, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.  हवाई वाहतूक तज्ञ डॉ. विपुल सक्सेना यांनी सुरक्षित लॅण्डिंग करणे वैमानिकांसाठी आव्हानात्मक बनल्याचे सांगत, यासंदर्भातील अनेक अडचणी अधोरेखित केल्या.  

हेही वाचा