संजय गांधी ते अजित पवार

विमान, हॅलिकॉप्टर अपघातांत भारतातील या नेत्यांचा झाला मृत्यू

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
3 hours ago
संजय गांधी ते अजित पवार

पणजीः भारतात (India) आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांचा (Political Leader) विमान, हॅलिकॉप्टर (Helicopter) अपघातात मृत्यू झाला आहे. आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे विमान बारामतीत कोसळले. हे विमान धुक्यामुळे आलेल्या अडथळ्यांमुळे भरकटले आणि त्यानंतर क्रॅश झाले असे सांगितले जाते. पवार यांच्यापूर्वी संजय गांधी, माधवराव सिंधिया, वाय एस आर रेड्डी अशा अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा मृत्यू झाला आहे. 

गुरनाम सिंग (१९७३)

पंजाबचे माजी मुख्यमंत्री गुरनाम सिंग यांचे ३१ मे १९७३ रोजी दिल्लीत झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते. 

बलवंतराय मेहता (१९६५)

गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बलवंतराय मेहता यांचा १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान मृत्यू झाला. पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानाने चुकून त्यांच्या नागरी विमानावर गोळीबार केला, त्यात ते ठार झाले.

संजय गांधी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मुलांपैकी एक. 23 जून १९८० रोजी त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. 

माधवराव सिंधिया – ज्योतिरादित्य सिंधियाचे वडील आणि वरिष्ठ काँग्रेस नेता.३० सप्टेंबर २००१ रोजी त्यांचा खासगी विमान अपघातात मृत्यू झाला. 

जीएमसी बालयोगी – लोकसभेचे सभापती आणि टीडीपीचे वरिष्ठ नेता होते. ३ मार्च २००२ रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. 

वायएस राजशेखर रेड्डी–  आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. हेलिकॉप्टर अपघातात २ सप्टेंबर २००९ रोजी मृत्युमुखी पडले. 

डॉ. डोर्जे खांडू – अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. हेलिकॉप्टर अपघातात ३० एप्रिल २०११ रोजी निधन झाले. 

ओपी जिंदाल व सुरेंद्र सिंग – हरियाणाचे मंत्री आणि वरिष्ठ नेते, हेलिकॉप्टर अपघातात २००५ मध्ये मृत्यू. 

विजय रुपानी – अहमदाबादमध्ये जून २०२५ मध्ये झालेल्या विमान अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे निधन. 

अजित पवार – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू. 


हेही वाचा