
वॉशिंग्टन : अमेरिकेला (America) हिमवादळाचा (Snowstrom) जबरदस्त तडाखा बसला असून, त्यात २७ जण ठार झाले आहेत. हिमवादळ व एकूण बदलत्या हवामानामुळे लाखो नागरिक कडाक्याची थंडी, वाहतुकीच्या समस्या व वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्यांचा सामना करीत आहेत. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोमवारी (Monday) ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली तर अजून सुरूच आहे. अतिवृष्टीमुळे दक्षिण भागातील लोकांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. बर्फवृष्टीत अनेक ठिकाणी लोक अडकल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय (National) हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, पिट्सबर्गच्या उत्तरेकडील भागात २० इंचापर्यंत बर्फवृष्टी झाली आहे तर तेथे तापमान उणे २५ अंश फॅरेनहाइटपर्यंत खाली घसरले आहे. नैसर्गिक आपत्तीचा जबरदस्त तडाखा बसल्याने; शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत तर अनेक शहरांमध्ये संचारबंदीसारखी परिस्थिती तयार झाली आहे. १ फूटापेक्षा जास्त बर्फ १ हजार ३०० मैलापर्यंत साचला असून, त्यामुळे महामार्ग बंद करण्यात आले आहेत.
६,७०,००० पेक्षा जास्त घरांचा वीजपुरवठा खंडित
वाहतुकीवर, विमान वाहतुकीवर वादळाचा जबरदस्त परिणाम झाला आहे. सोमवारी ८ हजारांपेक्षा जास्त विमाने उशिरा धावत होती तर कांही उड्डाणे एकूण परिस्थिती पाहून रद्द करण्यात आली. देशात ६,७०,०००० पेक्षा जास्त घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे तर नागरिक अंधारात व थंडीत दिवस काढत आहेत. विविध राज्यांमध्ये वादळामुळे मृत्यूच्या घटनांची नोंद झाली आहे. अनेक लोक मरत आहेत. एकूण परिस्थिती कठीण आहे.