राजस्थानमध्ये १० हजार किलो स्फोटके जप्त; एकाला अटक

प्रजासत्ताक दिनापूर्वी देशाला हादरवण्याचा मोठा कट अशा पद्धतीने उधळण्यात आला.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26 mins ago
राजस्थानमध्ये १० हजार किलो स्फोटके जप्त; एकाला अटक

नागौर: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असतानाच, राजस्थानमधील नागौरमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत देशाला हादरवण्याचा एक भीषण कट उधळून लावला आहे. रविवारी एका घरावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ९,५५० किलोग्रॅम अमोनियम नायट्रेटसह मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. याप्रकरणी मुख्य आरोपी सुलेमान खान याला पोलिसांनी अटक केली असून, त्याचे आंतरराज्य संबंध आणि मोठ्या कटातील सहभागाबाबत तपास सुरू झाला आहे.


Rajasthan: Nearly 10,000 kg ammonium nitrate seized ahead of Republic Day,  say police


नागौरचे पोलीस अधीक्षक मृदुल कछवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे विशेष पथकाने सुलेमान खान याच्या थानवला येथील घरावर आणि शेतावर छापा टाकला. या शोधमोहिमेदरम्यान १८७ कार्टनमध्ये भरलेले ९,५५० किलो अमोनियम नायट्रेट, ९ कार्टन डेटोनेटर, निळ्या आणि लाल रंगाच्या तारांचे अनेक बंडल तसेच इतर घातक साहित्य हस्तगत करण्यात आले. सुलेमान खान हा यापूर्वीही स्फोटक कायद्यांतर्गत नागौर आणि अलवरमधील तीन गुन्ह्यांमध्ये अडकलेला आहे. त्याच्यावर आता भारतीय न्याय संहिता आणि स्फोटक अधिनियम १८८४ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गणतंत्र दिवस से ठीक पहले बड़ी साजिश नाकाम! नागौर से 9,550 किलो अमोनियम  नाइट्रेट जब्त, आरोपी गिरफ्तार - क्या आतंकवाद की कड़ी?


तपासात असे समोर आले आहे की, आरोपी सुलेमान हा खाण मालकांना स्फोटकांचा पुरवठा करत असे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी इतक्या प्रचंड प्रमाणात साठवलेली स्फोटके पाहून पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, यामागे एखादा मोठा दहशतवादी कट असण्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय तपास यंत्रणाही आरोपीची चौकशी करण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटातही अशाच अमोनियम नायट्रेटचा वापर झाला होता, त्यामुळे पोलीस आता सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत.


10,000 kg ammonium nitrate seized ahead of Republic Day, biggest such haul  in Rajasthan | Jaipur News - The Indian Express
हेही वाचा