देशात ९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर भारतात थंडीची लाट

दिल्लीत गडगडासहीत पाऊस सुरू; १७ शहरांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
देशात ९ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; उत्तर भारतात थंडीची लाट

नवी दिल्ली : भारतातील (India) काही राज्यांत सध्या कडाक्याची थंडी असताना आता हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दिल्लीत (Delhi) पाऊस सुरू झाला आहे तर दिल्लीसहीत नऊ राज्यांमध्ये पुढील २४ तासांत वादळी वारा व मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही ठिकाणी ताशी ६० ते ६५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तराखंड (Uttarakhand)  व हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) जोरदार बर्फवृष्टीसह उत्तर भारतातील १७ शहरांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पुढील २४ तासांत राजस्थान (Rajsthan), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), पंजाब (Punjab), दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh),  उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख इत्यादी राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या दरम्यान ४० ते ६५ किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज ही हवामान खात्याने वर्तवला आहे. दिल्लीत शुक्रवारीपासूनच पाऊस पडू लागला आहे. पुढील २४ तासांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

या राज्यांत पाऊस, बर्फवृष्टीचा इशारा 

लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस व बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. ताम‌िळनाडू, पुद्दुचेरी व कराईकलमध्ये २५ व २६ जानेवारी तर केरळ व माहेममध्ये २६ जानेवारी रोजी वादळी वारा, विजांच्या कडकडाटासहीत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

दिल्लीत गडगडासहीत पाऊस

दिल्लीतील काही भागात व एनसीआर येथे शुक्रवारी सकाळी गडगडासहीत पाऊस  पडला. पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 

हेही वाचा