
तेहरान : इराण-इस्त्रायल-अमेरिका (Iran-Israel-USA) संघर्ष चिघळल्यास होर्मुझच्या सामुद्रधुनीतील समुद्राखालील इंटरनेट (Internet) केबल्सचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे भारतासह (India) अनेक देशांतील इंटरनेट सेवा ठप्प किंवा मंदावू शकते.
भारताच्या पश्चिमेकडील सुमारे एक तृतीयांश इंटरनेटचे जाळे या भागातून जाते. युद्ध चिघळल्यास इंटरनेट सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
आखातात युद्ध सुरू झाल्यानंतर चर्चेत असलेली होर्मुझची सामुद्रधुनी केवळ तेल वाहतुकीसाठीच नव्हे तर डिजिटल (Digital) पायाभूत सुविधांसाठी व डेटा वहनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची आहे.
या सागरी मार्गाच्या तळाशी इंटरनेट डेटाचे वहन करणारे फायबर ऑप्टिक केबल्सचे मोठे जाळे आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीच्या परिसरात युद्ध चिघळल्यास भारतासह अनेक देशांची इंटरनेट सुविधा ठप्प होऊ शकते.
भारताची आंतरराष्ट्रीय (International) इंटरनेट कनेक्टिव्हिटी प्रामुख्याने अरबी समुद्रातून युरोपला आणि आखाती प्रदेशला जात असलेल्या केबल्सवर विसंबून आहे. त्याला फटका बसल्यास त्याचा जबर परिणाम खालील सुविधांवर होऊ शकतो.
कशावर होऊ शकतो परिणाम?
ई मेल
ऑनलाइन बॅंकिंग
सोशल मिडिया
व्हिडीओ कॉल
स्ट्रीमिंग सेवा
क्लाउड कम्प्युटिंग
डिजिटल ऑपरेशन्स
इंटरनेट केबलचे जाळे विस्तारण्यासाठी होर्मुझ सामुद्रधुनीच्या तळात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळेच धोका वाढत आहे, अशी भीती लाइटस्टॉर्मचे प्रमुख अमजीत गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.