तर भडकणार तिसरे महायुद्ध : ते बेट ठरतेय संवेदनशील!

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
38 mins ago
तर भडकणार तिसरे महायुद्ध : ते बेट ठरतेय संवेदनशील!

तेहरान : इस्त्रायल (Israel), अमेरिका (USA) इराण (Iran) यांच्यामधील युद्धामुळे आखाती देशातील तणाव शिगेला पोहोचला आहे. अतिश्रीमंत ते देश सोडून जाऊ लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडू लागल्या आहेत. त्यातून जगाची चिंता वाढली आहे. इराणमधील एक बेट अतिशय संवेदनशील ठरत आहे. या बेटावर हल्ला झाल्यास तिसरे महायुद्ध (Third World War) कोणत्याही क्षणी पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्या बेटावर हल्ला झाल्यास अनेक देश या युद्धात ओढले जाणार आहे. अमेरिका, इस्त्रायल यांनी त्यामुळेच अजून या बेटावर हल्ला केलेला नाही. युद्धाची तीव्रता वाढत गेल्यास हे बेट सुरक्षित राहणार नाही व तिसरे महायुद्ध पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पर्श‌ियन आखातात इराणच्या खार्ग बेटावर (Kharg Island)  इराणमधील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. हे बेट त्यामुळेच संवेदनशील ठरत आहे. इस्त्रायल, अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा प्रकल्प, तेल कारखाने व लष्करी तळांवर हवाई हल्ले केले. मात्र, खार्ग बेट अजून सुरक्षित आहे. इराणचे ते सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र आहे.

इस्त्रायल किंवा अमेरिकेने या बेटावर हल्ला केल्यास इराणची संपू्र्ण अर्थव्यवस्था ठप्प होणार आहे. आणि जागतिक पातळीवर तेलाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढणार व अन‌ियंत्रीत होणार आहेत. त्यामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

इराणच्या तेल पुरवठ्याची खार्ग बेट जीवनरेखा आहे. हे बेट नियमित ७ दशलक्ष बॅरल तेल निर्यात करते. इराणच्या परदेशी तेल आयातीपैकी ९० टक्के आहे. या बेटावर हल्ला झाल्यास इराणची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होणार व त्याचबरोबर तिसरे महायुद्ध सुरू होण्याची शक्यता आहे. या बेटावर त्यामुळेच अमेरिका, इस्त्रायलने हल्ला केलेला नाही. 

हेही वाचा