दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण; केजरीवाल यांना दिलासा

सुटकेच्या आदेशाला तूर्तास स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण; केजरीवाल यांना दिलासा

नवी दिल्ली : दिल्लीतील (Delhi) मद्य धोरण घोटाळाप्रकरणात माजी मुख्यमंत्री (Ex-Chief Minister) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्यासहीत २३ जणांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे. मद्य घोटाळा प्रकरणात या सर्वांना कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. सीबीआयने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने (High Court) कनिष्ठ न्यायालयाच्या ‘डिस्चार्ज’ आदेशावर तातडीने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. 

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी उच्च न्यायालयात सीबीआयची बाजू मांडताना मद्य घोटाळा देशाच्या राजधानीतील इतिहासातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे. देशासाठी ही शरमेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. विशिष्ट व्यापारी वर्गाला फायदा मिळवून देण्यासाठी मुद्दामहून असे धोरण लागू करण्यात आले. हवाल्याच्या माध्यमातून लाचेची रक्कम फिरवण्यात आल्याचा दावाही मेहता यांनी यावेळी केला

ईडीच्या चौकशीवर या प्रकरणाचा पर‌िणाम होऊ शकतो, अशी भीतीही सॉलिसिटर जनरल यांनी यावेळी व्यक्त केली. उच्च न्यायालयाने त्याची दखल घेत निर्देश दिले आहेत की, सीबीआयच्या या याच‌िकेवर जोपर्यंत अंतिम निर्णय येत नाही, कनिष्ठ न्यायालयाने तोपर्यंत ईडी प्रकरणातील सुनावणी  लांबणीवर टाकावी. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी आणि उच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

हेही वाचा