निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून सुपरवायझरवर गुन्हा दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
निष्काळजीपणामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून सुपरवायझरवर गुन्हा दाखल

मडगाव: कुडतरी येथे विजेचा खांब बसवताना झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याप्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी सुपरवायझरविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. ही घटना २३ जानेवारी रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास गोघळ-कुडतरी येथे घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 'मेसर्स श्री गुरुकृपा एजन्सी' या संस्थेचे साईट सुपरवायझर देवराज एस. (रा. रायतळ-कुडतरी, मूळ रा. शिमोगा-कर्नाटक) यांनी रस्त्याच्या कडेला सिमेंटचा वीज खांब बसवताना आवश्यक ती काळजी आणि खबरदारी घेतली नव्हती. या हलगर्जीपणामुळे सिमेंटचा खांब तेथे काम करणाऱ्या गौरव कुमार (मूळ रा. भागलपूर-बिहार) या कामगाराच्या पायावर पडला.

यात गौरव कुमार गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (जीएमसी) दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मायना-कुडतरी पोलिसांनी संशयित देवराज एस. याच्याविरुद्ध निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


हेही वाचा