आता ३१ जानेवारी पर्यंत मुदत

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेत (Indian Railway) २२ हजार जाग्यांसाठी अर्ज करण्याच्या तारखेची मुदत वाढवून ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ग्रुप-डी लेव्हल-१ अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करण्याची सुधारीत अंतिम तारीख जाहीर केली आहे. देशभरात २२ हजार पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २१ जानेवारीपासून सुरू झाली असून; आता उमेदवारांना ३१ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. इच्छुक उमेदवार rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
उमेदवार किमान १०वी उत्तीर्ण असावा किंवा एनसीव्हीटी (NCVT) मान्यता प्राप्त संस्थेतून राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (National Apprenticeship Certificate) प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
पुरुष उमेदवारांसाठी: ३५ किलो वजन घेऊन २ मिनिटांत १०० मीटर चालणे
४ मिनिटे १५ सेकंदांत १000 मीटर धावणे
महिला उमेदवारांसाठी: २० किलो वजन घेऊन २ मिनिटांत १०० मीटर चालणे
५ मिनिटे ४० सेकंदांत १००० मीटर धावणे
वयोमर्यादा
किमान वय : १८ वर्षे
कमाल वय : ३६ वर्षे
अर्ज शुल्क
जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस : ५०० रुपये
एससी, एसटी, ईबीसी, महिला, ट्रान्सजेंडर : २५० रुपये
निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी (CBT)
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय तपासणी
वेतन
दरमहा २२,५००- २५,३८०
कटऑफ (अपेक्षित)
सामान्य व ईडब्ल्यूएस : ४०
ओबीसी (नॉन-क्रीमी लेयर) : ३०
एससी, एसटी : ३०
परीक्षा भाषा
आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मणिपुरी, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू.
परीक्षा नमुना
सामान्य विज्ञान : २५ प्रश्न – २५ गुण
गणित : २५ प्रश्न – २५ गुण
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र : ३० प्रश्न – ३० गुण
सामान्य जागरूकता व चालू घडामोडी : २० प्रश्न – २० गुण
एकूण : १०० प्रश्न – १०० गुण
अर्ज कसा करावा
उमेदवारांनी rrbapply.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करावे. नवीन नोंदणी करून आवश्यक माहिती भरावी, नोंदणीनंतर लॉगिन करून शुल्क भरावे (लागू असल्यास) आणि अर्जाची प्रिंटआउट जतन करून ठेवावी.