पीएफवरील ८.२५ टक्के व्याज लवकरच होणार खात्यात जमा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th March, 11:29 am
पीएफवरील ८.२५ टक्के व्याज लवकरच होणार खात्यात जमा

नवी दिल्ली : नोकरी करणाऱ्यांच्या आयुष्याची पुंजी असलेल्या पीएफ खात्यावर (Provident Fund Account)  ८.२५ टक्के व्याज देण्यात येणार अशी घोषणा करण्यात आली आहे. मात्र, हे व्याज आपल्या खात्यात कधी जमा होणार व नेमके किती व्याज जमा रकमेवर मिळणार याविषयी कर्मचाऱ्यांना उत्सुकता असते.

यासंदर्भात कोणतीही तारीख सरकारने किंवा केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organisation) जाहीर केलेली नसली तरी याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी तीन महिने लागू शकतात.

खात्यात पीएफची रक्कम येण्यापूर्वी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ईपीएफओच्या (EPFO) सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजकडून वर्षभरासाठी ईपीएफचे व्याजदर निश्च‌ित करण्यात येतात. नंतर सीबीटीचा निर्णय केंद्र सरकारकडे मंजूरीसाठी पाठवण्यात येतो.

या निर्णयावर केंद्र सरकार अंतिम निर्णय घेते. व्याजाची रक्कम त्यानंतर सदस्यांच्या खात्यात जमा होते. आता पहिला टप्पा पू्र्ण झाला आहे व अंतिम मंजुरीसाठी ३ महिने लागण्याची शक्यता आहे. 


हेही वाचा