गोव्यात ‘चॉईस नंबर’ची क्रेझ वाढती; २३ महिन्यांत २२ कोटींचा महसूल
वाहतूक खात्याच्या तिजोरीत भर : फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईतूनही लाखोंची वसुली
Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th December, 10:59 pm

🚗
💰 चॉईस नंबरद्वारे २३ महिन्यात २२.८७ कोटींचा महसूल
पणजी : गोव्यात नवीन वाहनासाठी पसंतीचा क्रमांक (चॉईस नंबर) घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यातून वाहतूक खात्याच्या तिजोरीत मोठी भर पडली असून जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या २३ महिन्यांच्या काळात चॉईस नंबरद्वारे खात्याला तब्बल २२.८७ कोटींचा महसूल मिळाला आहे.
या आकडेवारीनुसार खात्याला महिन्याला सरासरी ९९ लाख, तर दिवसाला सरासरी ३.२० लाख रुपये महसूल मिळाला.
२०२४ मध्ये ३,५४१ वाहन मालकांनी चॉईस नंबर घेतले. यातून खात्याला ११ कोटी ४२ लाख ४२ हजार रुपयांचा महसूल मिळाला. यामध्ये २०७७ चारचाकी, ११४७ दुचाकी, ११० मालवाहतूक वाहने आणि ८६ बस व अन्य वाहनांचा समावेश होता.
एकूण महसूल
₹२२.८७ कोटी
२३ महिन्यात
मासिक सरासरी
₹९९ लाख
प्रति महिना
दैनंदिन सरासरी
₹३.२० लाख
प्रति दिवस
🎬
१६ जणांची 'जेम्स बाँड'ला पसंती
'०००७' हा क्रमांक वाहनाला घेण्यात येतो. वरील कालावधीत १६ जणांनी हा क्रमांक घेतला. यामध्ये ५ चारचाकी तर ११ दुचाकींचा समावेश आहे.
⚠️
फॅन्सी नंबर प्लेटवर दंडात्मक कारवाई
१) जानेवारी २०२४ ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या ५०५७ जणांना चलन दिले.
२) याद्वारे सुमारे २७ लाख रुपये दंड वसूल केला.
३) ३५.९४ लाख रुपयांचा दंड येणे बाकी आहे.
व्हीआयपी नंबर किंमत
₹३ लाख
०००१ ते ०००९
१७ नंबर प्लेट
सलग आकडे
११११, २२२२
१२ चारचाकी
२९ दुचाकी
२०२५ (जाने-नोव्हें)
३,५२४ वाहने
₹११.४५ कोटी
महसूल
नंबर प्लेट प्रकार
१) जुन्या वाहनासारखाच क्रमांक
२) चढत्या अथवा उतरत्या क्रमाचा क्रमांक
३) चालू सीरिज सोडून अन्य क्रमांक
४) सलग येणारे दुहेरी क्रमांक
#Goa #ChoiceNumber #VehicleRegistration #Revenue #TrafficDepartment #Panaji