वाचकांच्या प्रतिक्रिया : दै. ‘गोवन वार्ता’च्या ‘चर्चेची वार्ता’ सदरात उमटले संमिश्र सूर

पणजी : ‘जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निकालाने गोव्यातील विरोधी पक्षांना बळ मिळाले आहे का?’ असा प्रश्न दै. गोवन वार्ताच्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवरील ‘चर्चेची वार्ता’ या सदरात विचारण्यात आला होता. यावर विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी राजकीय विश्लेषण, टीका आणि सल्ले अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 
विजय सरदेसाई हे विरोधी पक्षातील १०० टक्के सक्षम असे आमदार आहेत. ते सत्ताधारी पक्षाचे गैरप्रकार उघडकीस आणतात खरे. पण, चार ते आठ दिवसांनंतर ते त्या विषयावर मौन पाळतात. - प्रदीप सावंत
उमेदवार चांगले असतील, तरच हे शक्य आहे. अन्यथा नाही. फक्त टीका करून काहीही साध्य होणार नाही. - मर्विन डिमेलो
भ्रष्ट भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. - महेंद्र नार्वेकर

काही शिल्लक राहिलेच असेल, तर योगाच्या शिबिरात चार दिवस बसा आणि नीट (व्यवस्थित) विचार करा. - मधुसुदन बोरकर
आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी माणिकराव ठाकरेंची माफी मागितली. - सच्चिदानंद नाईक

गोव्यात भाजप सर्वाधिक जागा जिंकून राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनला आहे, आगामी निवडणुकीत विरोधक एकत्र येऊनही लढले तरीही भाजप पक्षच विजयी होईल, असे चित्र आहे. विरोधी पक्ष कधीही एकत्र येणार नाहीत, त्याचा फायदा साहजिकच भाजपला होणार. - नितीन गावडे
भाजपचा विजय झाला की तुम्हाला बळ येते आणि तुम्ही वाट्टेल तसे बोलता. नेहमी असेच होत आले आहे. - संजय पै