एका दिवसात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल

भाजपचे ४, आरजीपीचे १२ तर ९ अपक्ष उमेदवारांनी भरले अर्ज

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
06th December, 11:35 pm
एका दिवसात जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी (District Panchayat Election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. शनिवारी एकाच दिवशी १८ मतदारसंघांतून एकूण २५ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. भाजप(BJP), आरजीपी (RGP), काँग्रेस (congress) आणि अपक्ष (Independent) उमेदवारांनी हे अर्ज भरले आहेत. दाखल झालेल्या २५ उमेदवारांपैकी भाजपचे ४ उमेदवार, आरजीपीचे १२, काँग्रेसचा १ आणि ९ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज भरले आहेत.
उत्तर गोव्यात धारगळ मतदारसंघात रवींद्र हरमलकर (भाजप) आणि अनिल हरमलकर (आरजीपी), तोरसे नारायण शिरोडकर (आरजीपी) आणि राघोबा कांबळी (भाजप), सुकूरचे कार्तिक कुडणेकर (अपक्ष) आणि तीओतीन लोबो (आरजीपी), रेईश मागूश आर्लेन ब्रागांझा (आरजीपी), पेन्ह द फ्रान्स रोहन धावडे (आरजीपी), ताळगाव विजू दिवकर (काँग्रेस), लांटबार्से कृष्णराव राणे (अपक्ष), पाळी सुंदर नाईक (भाजप), नगरगाव धुळू शेळके (अपक्ष) आणि नीलेश गावकर (आरजीपी) यांनी अर्ज सादर केले.
दक्षिण गोव्यात बेतकी खांडोळा मतदारसंघात संजीवनी तळेकर (अपक्ष), शिरोडा दिपिंती शिरोडकर (आरजीपी), राय आंतोनेत फर्नांडिस (आरजीपी) आणि फातिमा गावकर (अपक्ष), नुवेचे सेबिस्तीयाव सिल्वेरा (आरजीपी), कोलवा एन्थनी रोबर्ट्स (आरजीपी), वेळ्ळी डॅग्ली फर्नांडिस (आरजीपी), दवर्ली प्रदीप वेर्लेकर (अपक्ष), कुडतरी विवेक नाईक (अपक्ष), शेल्डे रामानंद नाईक (अपक्ष) आणि कुठ्ठाळी एन्जेलीन तेलीस (आरजीपी) यांनी अर्ज सादर केले. दरम्यान या अर्जांमुळे आता जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला लवकरच जोर येण्याची शक्यता आहे.