
म्हापसा : जुने गोवे येथे बेकायदेशीर बांधकामाच्या मुद्द्यावरून अल्पवयीन मुलीला गलिच्छ शिवीगाळ करून विनयभंगाचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी मोंतेरो (रा. मडकईकर अपार्टमेंट) नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही घटना शुक्रवार दि. ५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. मालमत्तेत सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत फिर्यादींनी संशयिताला जाब विचारला असता हा प्रकार घडला.
संशयित या मुद्द्यावरून तक्रारदाराच्या अंगावर आला. तिला गलिच्छ शब्दांत शिवीगाळ केली आणि चुकीच्या पद्धतीने हावभाव केले. त्यानंतर युवतीने जुने गोवे पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा.न्या.सं.च्या १३१, ३५२ व ७९ कलमान्वये संशयिताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी संशयिताला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साईश भोसले हे करीत आहेत.