मधुमेह हा संपूर्ण शरीरावर परिणाम करणारा विकार असला तरी महिलांमध्ये तो काही विशेष आरोग्य स्थिती उत्पन्न करतो. त्यापैकी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे डायबिटिक रेटीनोपॅथी.

मधुमेहामुळे डोळ्यांतील रेटिनावर परिणाम करणारी स्थिती. योग्य वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास ही स्थिती दृष्टी कमी होणे किंवा अंधत्वास कारणीभूत ठरू शकते. ही स्थिती सखोल समजण्यासाठी आज आपण महिलांमध्ये मधुमेहाचा डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, रेटीनोपॅथीची लक्षणे, धोके आणि त्यावरील उपाय याविषयी जाणून घेऊ.
महिलांमध्ये रेटीनोपॅथीची
वाढती समस्या
जगभरातील संशोधनानुसार महिलांमध्ये दृष्टी गमावण्याचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आढळते, विशेषतः मधुमेहाशी संबंधित आजारांमध्ये.
भारतात मधुमेही लोकसंख्येत महिलांमध्ये उशिरा निदान होण्याचे प्रमाण जास्त असल्याने रेटीनोपॅथी उशिरा लक्षात येते.
गर्भावस्थेतील मधुमेह असलेल्या सुमारे १०–२५% (दहा ते पंचवीस टक्के) महिलांना गर्भधारणा दरम्यान किंवा नंतर रेटीनोपॅथीची सुरुवात दिसू शकते.
डायबिटिक रेटीनोपॅथी
म्हणजे काय?
रेटिनामध्ये असलेल्या सूक्ष्म रक्तवाहिन्या जर रक्तातील उच्च साखरेच्या प्रमाणामुळे कमकुवत झाल्या, गळू लागल्या किंवा बंद झाल्या तर दृष्टीवर परिणाम होतो.
हीच स्थिती म्हणजे डायबिटिक
रेटीनोपॅथी.
महिलांमध्ये रेटीनोपॅथीचा धोका जास्त का असतो?
हार्मोनल बदल: गर्भधारणा, मासिक पाळी आणि रजोनिवृत्ती या हार्मोनल बदलांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वरखाली होत राहते व इन्सुलिन रेसिस्टन्सवर परिणाम होतो. याचा थेट त्रास रेटिनाच्या रक्तवाहिन्यांवर दिसून येतो.
गर्भावस्थेतील मधुमेह (जेस्टेशनल डायबिटीज): गर्भावस्थेदरम्यान निर्माण होणारा मधुमेह आधीपासून मधुमेह असलेल्या महिलांमध्ये रेटीनोपॅथीचा धोका वाढवू शकतो.
लोह-अभावजन्य अशक्तपणा (अनेमिया): अनेक महिलांमध्ये दिसणारा हा आजार रेटिनाला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन न मिळण्याचे कारण ठरू शकतो.
अनियमित जीवनशैली व दीर्घकाळ अनियंत्रित साखर: करिअर, कुटुंब आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देण्यासाठी वेळ कमी मिळतो. त्यामुळे शरीरातील साखरेचे नियंत्रण बिघडू शकते.
रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा परिणाम: महिलांमध्ये उच्च रक्तदाब व कोलेस्टेरॉलची समस्या सामान्य असते. त्यामुळे डोळ्यांतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि रेटीनोपॅथीचा धोका वाढतो.
हार्मोनल थेरपी / गर्भनिरोधक गोळ्या: काही औषधांमुळे रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे डोळ्यांतील रक्तवाहिन्यांवर ताण निर्माण होतो.
रेटीनोपॅथीचे दोन प्रमुख टप्पे:
१. नॉन-प्रोलिफरेटिव्ह रेटीनोपॅथी (NPDR) — ३ स्तर (तीन स्तर)
२. प्रोलिफरेटिव्ह रेटीनोपॅथी (PDR) — गंभीर टप्पा
रेटीनोपॅथीच्या तपास पद्धती
फंडोस्कोपी: डॉक्टर विशेष साधनाद्वारे रेटिनाची तपासणी करतात.
महिलांनी कोणती काळजी घ्यावी?
१. रक्तातील साखरेचे नियंत्रण राखा
HbA1c पातळी नियंत्रित ठेवणे रेटीनोपॅथीचा धोका ५०% (पन्नास टक्के) पर्यंत कमी करू शकते.
२. नियमित डोळ्यांची तपासणी
मधुमेह असल्यास वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करावी.
गर्भवती महिलांनी गर्भधारणेच्या सुरुवातीलाच तपासणी करून घ्यावी.
३. रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवा
हे दोन्ही घटक रेटिनाचे आरोग्य जपण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.
४. संतुलित आहार व सक्रिय जीवनशैली
हिरव्या भाज्या, ओमेगा-३ युक्त पदार्थ, पूर्ण धान्य आहारात असावे.
दररोज ३० (तीस) मिनिटे व्यायाम करावा.
५. धूम्रपान टाळा
५. धूम्रपान टाळा
व्हिट्रेक्टॉमी सर्जरी:
रेटिना सुटण्याचा धोका असल्यास ही सर्जरी रक्तस्त्राव काढण्यासाठी केली जाते.
योग्य वेळी उपचार सुरू केल्यास दृष्टी नष्ट होण्यापासून वाचवले जाऊ शकते.
महिलांमध्ये मधुमेहाशी संबंधित आरोग्याच्या धोक्यांपैकी दृष्टी गमावण्याचा धोका अधिक गंभीर आहे. पण योग्य आहार, जीवनशैली, वेळेवर तपासणी आणि उपचार यामुळे डायबिटिक रेटीनोपॅथीवर पूर्णपणे नियंत्रण ठेवले जाऊ शकते.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर