वैद्यकीय डॉक्टर बनूनही जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न केले पूर्ण : साध्या राहणीमानामुळे ठरतात लोकप्रिय

मध्यप्रदेश (Madhya Pradesh) : एकदा आयएएस (IAS) पूर्ण करून जिल्हाधिकारी बनला की थाटच वेगळा असतो. एसी गाडी, बंगला, सुरक्षारक्षक अशा सर्व सुविधा मिळत असल्याने, रुबाब ही वेगळा असतो. मात्र, सायकलवरून जाणारा जिल्हाधिकारी कधी आपण ऐकला आहे का?
देशात असे ही एक जिल्हाधिकारी आहेत जे नेहमी सायकलवरून आपल्या कार्यालयात जातात. ‘साधी राहणी, उच्च विचार’ याची मिसाल असलेले जिल्हाधिकारी म्हणजे डॉ. सतीश कुमार एस (Collector Dr. Satish Kumar S) ते नेहमी आपल्या सायकलवरून कार्यालयात जातात.
साधे राहणीमान, आगळ्यावेगळ्या स्टाईलमुळे लोकप्रिय होत आहेत.
मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्याचे ते जिल्हाधिकारी (Collector) आहेत. २८ जानेवारीला त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. मुळचे तामिळनाडू येथील असून, मद्रास वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएसची (MBBS) पदवी घेतली.
मात्र, डॉक्टरकी सोडून त्यांनी आयएएस बनण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. २०१३ मध्ये युपीएससी परीक्षेत यश मिळवत आयएएस बनले. शाळेत शिकत असतानाच त्यांना प्रशासकीय सेवा आकर्षित करीत होती.
वैद्यकीय डॉक्टर बनून ही आयएएस पूर्ण करून जिल्हाधिकारी बनण्याच्या ध्येयाने पछाडले होते. अखेर त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले. तरी त्याचा बडेजाव न करता साधे राहणीमान स्वीकारले.
डॉ. सतीश यांना सायकलवरून प्रवास करणे आवडत असून, त्यामुळे नेहमी सायकलवरून आपल्या कार्यालयात जात असतात. त्यांच्या सोबत असलेला सुरक्षारक्षकही सायकलवरूनच जात असतो.
सायकलवरून प्रवास केल्यास व्यायाम होत असतो. हवेचे प्रदूषण होत नाही व इंधनाची बचत होते. त्याचप्रमाणे मानसिग आरोग्यही चांगले राहत असल्याचे डॉ. सतीश यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेशात डॉ. सतीश यांनी विविध महत्त्वांच्या पदांवर सेवा केली आहे. संवेदनशीलता, शिस्तप्रिय, कामातील तत्परता यामुळे ते नागरिकांमध्येही लोकप्रिय आहेत.
जीवनात छोटेसे काही मिळवले की मोठा बडेजाव करणारे व मिरवणारे खूप असतात. मात्र, डॉक्टर, आयएएस शिक्षण पूर्ण करून जिल्हाधिकारी बनूनही सायकलने कार्यालयात जाऊन खरी देशसेवा करणारे डॉ. सतीश सारखी व्यक्तीमत्त्वे खरी ’हिरो’ ठरतात व जनतेच्या ह्रदयात स्थान मिळवत असतात. आपल्याला काय वाटते?