फेडरेशन ऑफ सिनियर जर्नालिस्ट्स संघटना, गोवा ज्येष्ठ पत्रकार संघटना, माहिती आणि प्रसिद्धी खाते व गुज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक. सोबत दीपक बांदेकर व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : देशातील ज्येष्ठ पत्रकारांना एकसमान पेन्शन लागू करण्याच्या मागणीवर केंद्र सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल, असे ठोस आश्वासन केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिले. ज्येष्ठ पत्रकार महासंघाच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
फेडरेशन ऑफ सिनियर जर्नालिस्ट्स या संघटनेने गोवा ज्येष्ठ पत्रकार संघटना, माहिती आणि प्रसिद्धी खाते व गोवा श्रमिक पत्रकार संघटना (गुज) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय परिषदेची पहिली बैठक आयोजित केली आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष गुरुदास सावळ यांनी स्वागत केले. माहिती संचालक दीपक बांदेकर, महासंघाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांची यावेळी भाषणे झाली. महासंघाचे महासचिव एन. पी. चेकुट्टी यांनी आभार मानले. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला १७ राज्यांतील प्रतिनिधी आले आहेत.