तापामुळे आणखी एका कामगाराचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
तापामुळे आणखी एका कामगाराचा मृत्यू

मडगाव : दोन दिवसांपूर्वी मायना कुडतरी परिसरातील युवकाचा तापाने मृत्यू झाला होता. आता असोळणा तारीवाडा येथील अनिल बहादूर राय (३०, मूळ पश्चिम बंगाल) याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यालाही २ नोव्हेंबरपासून ताप येत होता.

कुंकळ्ळी पोलिसांना गोमेकॉतून माहिती मिळाली की, उपचार सुरू असलेल्या कुंकळ्ळीतील रुग्णाचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अनिल बहादूर राय हा तारीवाडा असोळणा येथे सध्या राहत होता. तो कॅरोलिन डिसिल्वा यांच्याकडे काम करत होता. अनिल याला २ नोव्हेंबरपासून ताप येत होता. ४ नोव्हेंबर रोजी त्याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. तब्येतीत सुधारणा न झाल्याने बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात त्याला दाखल करण्यात आले. मात्र, आपत्कालीन विभागात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी कुंकळ्ळी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली. पोलीस उपनिरीक्षक सुदन भोसले याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मायना कुडतरी परिसरातील युवकाचा तापाने मृत्यू झाला होता. त्यालाही दोन दिवस ताप येत होता, पण तो इस्पितळात दाखल झाला नव्हता. 

हेही वाचा