तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कामगाराचा जागीच मृत्यू

वास्को : बांधकामाच्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर प्लास्टरिंगचे काम करीत असताना तोल गेल्याने जमिनीवर पडलेला तबरेज आलम (३४) याचा जागीच मृत्यू झाला. तर, बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तरबेज आदळल्याने ती मुलगी जखमी झाली. तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा बिहारचा परंतु सध्या गोवा वेल्हा येथे राहणारा तबरेज आलम हा झुआरीनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी गवंडी म्हणून काम करीत होता. सोमवार, दि. ४ रोजी तो तिसऱ्या मजल्यावरील प्लास्टरिंगचे काम करीत होता. सायंकाळी चारच्या दरम्यान काम करीत असताना त्याचा तोल गेला. तिसऱ्या मजल्यावरून खाली पडत असताना बांधकामाच्या ठिकाणी जमिनीवर उभ्या असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर तो आदळला. तरबेज उंचीवरून खाली पडल्याने तेथेच मरण पावला. तर खाली पडत असताना त्या मुलीच्या मानेवर आदळल्याने ती मुलगीही जखमी झाली. तिच्या मानेला व डोक्याला जखमा झाल्या. या घटनेचा वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रमिला फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत. 

हेही वाचा