मूळ झारखंड येथील युवकाचा मृत्यू

मडगाव : दोन दिवस ताप येत असतानाही इस्पितळात न जाता अंगावर ताप काढलेल्या आकाश मांझी या युवकाचा मृत्यू झाला. मायना कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातून मायना कुडतरी पोलिसांना आपत्कालीन विभागात एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी इस्पितळात जात माहिती घेतली असता मृताचे नाव आकाश मांझी असून तो मूळ झारखंड येथील असून सध्या रामनगरी येथे राहत होता. त्याचा चुलत भाऊ रमण मांझी याने सांगितले की, आकाश याला मागील दोन दिवसांपासून ताप येत होता. परंतु तो इस्पितळात किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याकडेही गेला नाही. तब्बेत बिघडली असता त्याला इस्पितळात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. मायना कुडतरी पोलिसांनी या प्रकरणी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.