शिळ्या चपात्यांची भाजी

शिळी चपाती फेकून न देता तिच्यापासून एक चविष्ट आणि पोटभरीचा पदार्थ कसा बनवायचा? घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात झटपट होणारी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही खास 'शिळ्या चपात्यांची भाजी'ची सोपी कृती!

Story: चमचमीत रविवार |
16 hours ago
शिळ्या चपात्यांची भाजी

साहित्य:

५ ते ६ शिळ्या चपात्या (बारीक तुकडे केलेले)
२ बारीक चिरलेले कांदे.
२ बारीक चिरलेले टोमॅटो.
१ बारीक चमचा हळद.
१ बारीक चमचा तिख टा नुसार लाल तिखट.
१ मोठा चमचा आलं-लसूण पेस्ट.
१ बारीक चमचा आमचूर पावडर.
२ बारीक चमचे मॅजिक मसाला.
बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर.
चवीनुसार मीठ.
पाणी.
तेल.

कृती:

प्रथम एक भांडे गॅसवर तापत ठेवा. भांडे तापले की त्यात २ मोठे चमचे तेल घाला. तेल तापले  की त्यात बारीक चिरलेले कांदे घाला. हे कांदे मऊ झाले की त्यात आलं-लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेले टोमॅटो घाला व टोमॅटो छान शिजेपर्यंत परतून घ्या. आता यात सगळे मसाले - हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, मॅजिक मसाला, चवीनुसार मीठ, अगदी थोडे पाणी घाला व छान उकळी काढा. उकळी आली की त्यात बारीक केलेल्या चपात्या आणि खूप सारी कोथिंबीर घालून ही भाजी तयार करा.


संचिता केळकर