म्हणाली-रोहित आर्यचा होता 'फुलप्रूफ' प्लॅन. चॅटचे स्क्रीनशॉट्सही केले शेअर.

मुंबई: मुंबईतील पवई (Powai) येथील आरए स्टुडिओत नुकत्याच झालेल्या होस्टेज कांडानंतर (ओलीस ठेवण्याच्या घटनेनंतर) रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. १७ लहान मुलांसह १९ लोकांना ओलीस ठेवून महाराष्ट्र सरकारने थकवलेले २.४ कोटी रुपये मागणाऱ्या आरोपी निर्माता रोहित आर्य (Producer Rohit Arya) याने हे भयानक कृत्य करण्याच्या अगदी आधी एका मराठी अभिनेत्रीला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे.

मराठी अभिनेत्री रुचिता विजय जाधव (Ruchira Vijay Jadhav) यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करून हा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला आहे, तसेच त्यांनी रोहित आर्यसोबत झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट्सही शेअर केले आहेत.

'शिक्षिकेचे पात्र' देऊन जाळ्यात ओढण्याचा डाव
रुचिता जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्यने त्यांना सर्वप्रथम ४ ऑक्टोबर रोजी मेसेज केला होता आणि चित्रपटावर बोलायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी त्याने 'होस्टेज सिच्युएशन' (Hostage Situation) या विषयावर आधारित चित्रपट प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी त्यांना भेटायला बोलावले. या घटनेविषयी पत्रकारांशी बोलताना रुचिता यांनी सांगितले की, आर्यने त्यांना चित्रपटाची कथा ऐकवली होती. कथेनुसार, एक भला माणूस त्याच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी काही मुलांना ओलीस ठेवतो. रुचिताने तिची भूमिका विचारल्यावर आर्यने सांगितले की, तुझी शिक्षिकेची भूमिका असेल, जी त्या मुलांबरोबर ओलीस ठेवली जाते.

आर्यने त्यांना २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओत ऑडिशनसाठी येण्याची माहिती दिली होती. यावरून रोहित आर्यने आपला हा खरा आणि जीवघेणा प्लॅन पूर्ण करण्यासाठी चित्रपटाच्या नावाखाली अभिनेत्रीलाही ओलीस ठेवण्याचा 'फुलप्रूफ' प्लॅन आखला होता, हे स्पष्ट होते.
कौटुंबिक कारण ठरले 'तारणहार'
रोहित आर्यने २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान ऑडिशनचा पर्याय दिला होता आणि रुचिता जाधव यांनी २८ ऑक्टोबर रोजी भेटायला होकार दिला होता. मात्र, एका अपरिहार्य कौटुंबिक कारणामुळे त्यांना ही भेट ऐनवेळी रद्द करावी लागली. रुचिता यांनी खुलासा केला की, सासऱ्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना मुंबईला जाणे शक्य झाले नाही. त्यांनी हेच कारण सांगून रोहित आर्यचा भेटीचा मेसेज टाळला. यानंतर आर्यने त्यांना १५ नोव्हेंबरनंतर भेटू, असा मेसेज पाठवला होता.
'माझा थरकाप उडाला!'
गुरुवारी (३० ऑक्टोबर) आरए स्टुडिओत रोहित आर्यने १७ लहान मुलांसह १९ लोकांना ओलीस ठेवल्याची आणि नंतर पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाल्याची बातमी टीव्हीवर पाहताच रुचिता जाधव यांना धक्काच बसला. याबाबत त्यांनी इन्स्टाग्रामवर आपली भावना व्यक्त करताना लिहिले आहे, आज (३१ ऑक्टोबर) जेव्हा मी याच व्यक्तीशी संबंधित ही भयानक घटना बातमीत पाहिली, तेव्हा माझा थरकाप उडाला.
मी त्या अनुचित घटनेपासून थोडक्यात वाचले, हे माझ्या मनात सारखे येत आहे. न भेटण्याचा त्यांचा निर्णय 'अंतःप्रेरणा' (Instincts) होती, असे सांगत त्यांनी देवाचे आभार मानले. कामासाठी नवीन आणि अनोळखी व्यक्तींना भेटताना प्रत्येकाने अत्यंत काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी लोकांना दिला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे जेष्ठ अभिनेते गिरीश ओक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारेसुद्धा आर. ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्याला भेटल्याचे आणि ऑडिशन देत असलेल्या मुलांशी त्यांनी संवाद साधल्याचेही आता समोर आले आहे.