सर्वोच्च न्यायालयाची याचिकेवर सुनावणी घेण्यास संमती

नवी दिल्ली : बलात्कारकरून हत्या केल्याप्रकरणी एका व्यक्तीला सत्र न्यायालयाने (Session Court) फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई उच्च न्यायालयाने (High Court) त्याची शिक्षा कायम ठेवली. मात्र, नंतर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निर्दोष सुटका केली. तोपर्यंत त्याची १२ वर्षांची शिक्षा भोगून पूर्ण झाली होती. आता या व्यक्तीने बेकायदा अटक, खोटे पुरावे सादर करून चालवला खटला व भोगलेली शिक्षा यासाठी नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी संमती दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संदीप मेहता आणि विक्रम नाथ यांच्या खंडपीठासमोर प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. खंडपिठाने याचिका स्वीकारली असून, अॅटॉर्नी व सॉलिसिटर जनरल यांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा केली आहे. २०१३ साली ठाणे जिल्ह्यात प्रकरण घडले होते. आरोपी मूळ उत्तरप्रदेश येथील आहे.