राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले राफेल लढाऊ विमानातून उड्डाण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले राफेल लढाऊ विमानातून उड्डाण

हरयाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी बुधवारी हरयाणाच्या (Haryana) अंबाला येथील हवाई दलाच्या तळावरून राफेल लढाऊ विमानातून (Rafale fighter jet) उड्डाण केले. एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनीही त्याच हवाई तळावरून राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केले. भारताच्या राष्ट्रपतींनी राफेल विमानात चढण्यापूर्वी जीसूट घातला होता. सनग्लासेस घालून व हातात हेल्मेट धरून राष्ट्रपतींनी पोज देखील दिली. विमानाने उड्डाण घेण्याच्या काही वेळ आधी, राष्ट्रपतींनी जेटच्या आतून हात हलवून स्वागत केले. बुधवारी सकाळी हवाई दलाच्या तळावर पोहोचल्यानंतर राष्ट्रपतींनी औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. 

२२ एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये राफेल जेट्सचा वापर करण्यात आला होता.  यापूर्वी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम आणि प्रतिभा पाटील यांनी अनुक्रमे ८ जून २००६ आणि २५ नोव्हेंबर २००९ रोजी पुण्याजवळील लोहेगाव येथील हवाई दल तळावर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानातून उड्डाण केले होते.

हेही वाचा