बोरी पुलासाठी आणखी २.२४८५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची अधिसूचना जारी. स्थानिक शेतकऱ्यांचा मात्र तीव्र विरोध

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
5 hours ago
बोरी पुलासाठी आणखी २.२४८५ हेक्टर जमिनीचे संपादन होणार

पणजी: प्रस्तावित बोरी पुलाच्या बांधकामासाठी लोटली, बोरी आणि कवळे या तीन गावांमध्ये मिळून आणखी २२,४८५ चौरस मीटर (२.२४८५ हेक्टर) जमिनीचे संपादन केले जाणार आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.. मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, संबंधित जमीन मालकांना या भू-संपादनासंदर्भात हरकती आणि सूचना सादर करण्यासाठी २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांचा पुलाच्या आराखड्याला विरोध

बोरी पुलासाठी करण्यात येत असलेल्या भू-संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. हा पूल त्यांच्या शेतजमिनीतून (शेतां) जात असल्याने, त्यांनी पुलाच्या आराखड्यात बदल करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतरही सरकारने पुलाचे काम पुढे नेण्याची प्रक्रिया सुरू ठेवली आहे. आता या नव्या अधिसूचनेमुळे पुलासोबत बायपास रस्त्यासाठीही आणखी जमीन संपादित करावी लागणार आहे. प्रस्तावित बोरी पूल आणि बायपास रस्त्याची एकूण लांबी ५.७३ किमी इतकी आहे.

हेही वाचा