शिवोली, बार्देश येथे १.१० लाखाचे कोकेन व ६.८१ लाख रोख जप्त

ज्यूड बौसारी या कॅमेरून नागरिकाला अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
शिवोली, बार्देश येथे १.१० लाखाचे कोकेन व ६.८१ लाख रोख जप्त

पणजी : हणजूण पोलिसांनी बामणवाडा,ओशेल, शिवोली येथे १०.५३ ग्रॅम कोकेन अमलीपदार्थ (Cocaine Drugs) व ६ लाख, ८१ हजार, ८०० रुपयांचे विविध चलन यासहीत ज्यूड बौसारी (४४ वर्षे) या कॅमेरून (Cameroon) नागरिकाला अटक केली. निळ्या रंगाची स्कूटर ही जप्त करण्यात आली. 

यासंदर्भात हणजूण पोलीस (Anjuna Police) स्थानकाचे उपनिरीक्षक रमेश हरिजन यांनी एनडीपीएसप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात सविस्त माहिती अशी की, २९ ऑक्टोबर रोजी  शिवोली, बार्देश येथील  बामणवाडा  येथे एका व्हिलाजवळ निळ्या रंगाच्या स्कूटरने (जीए-०३-बीडी-११६४)  जात असलेल्या इसमाला थांबवले. झाडाझडतीत त्याच्याकडे कोकेन व रोख रक्कम सापडली. तपासणीत १ लाख, १० हजार रुपये किंमतीचे १०.५३ ग्रॅम कोकेन व ६ लाख, ८१ हजार, ८०० रुपयांचे विविध प्रकारचे चलन सापडले. जप्त केलेले ड्रग्ज व रोख रक्कम पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली. आरोपीला सध्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. अटकेबाबत संबंधित दूतावासाला कळविण्याचे एफआरआरओला कळविण्यात आले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या ज्यूड याच्याविरुद्ध यापूर्वी यावर्षीच १८ जुलै रोजी ड्रग्ज प्रकरणात क्राईम ब्रांचने गुन्हा नोंदवला होता.  नामबोंग फ्रेड (२१ वर्षे) या कॅमेरून युवकाला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी क्राईम ब्रांच त्याचा शोध घेत होते.  हणजुण पोलीस क्राईम ब्रांच यांनी एकत्रित कारवाई करून ज्यूड याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

हेही वाचा