आज 'यलो अलर्ट’

पणजी : गोव्यात (Goa) ऑक्टोबर महिन्यात पावसाने (Rain) उच्चांक गाठला असून, गोव्यात ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत ९१ टक्के जास्त पाऊस पडला आहे. या महिन्यात आतापर्यंत ३०३ मिमी पाऊस पडला आहे. महिन्याची ही दुप्पट सरासरी असून, पाऊस सुरू झाल्यावर दर महिन्याला सरासरी १५९ मिमी एवढी सरासरी आहे. पणजी (Panjim) येथे सोमवारी २५ मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे महिन्याची सरासरी ३७७.६ मिमी एवढी झाली. मुरगावात सर्वात जास्त ५४ मिमी पाऊस पडला. त्यामुळे महिन्याची सरासरी ४१७ मिमी एवढी झाली. पणजी व मुरगाव येथे अनुक्रमे २४४ मिमी व २९२ मिमी एवढी जास्त पावसाची नोंद झाली. पणजी व मुरगाव येथे अनुक्रमे जास्तीतजास्त तापमानात ३.७ सी व ४.२ सी एवढी घट झाली. आद्रता अनुक्रमे ९७% व ९५% एवढी राहिली. पणजी व मुरगाव येथे कमीतकमी तापमानात ही घट झाली. पणजीत १ सी. मुरगावात २ सी. एवढी घट झाली. निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा ओसरल्यावर हवामान पुर्वपदावर येणार आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरगाव येथे ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त म्हणजे ४१७ मिमी. पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी पर्यंतचा या सरासरीत समावेश आहे. पेडणे येथे ४०८ पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पावसाची नोंद मडगावात झाली. हे प्रमाण ८८ मिमी. एवढे आहे. हवामान खात्याने (IMD) आज २९ ऑक्टोबर रोजी 'यलो अलर्ट' (Yellow Alert) जारी केला आहे.