सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद

पणजी : गोव्यातील (Goa) आगोंदा, काणकोण (Agonda, Canacona) येथे एका घराच्या आवारात बिबट्या (Leopard) घुसला. त्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घराच्या आवारात बिबट्या घुसल्याचे चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. आणि घरचे व शेजारीही आरामात फिरणारा बिबट्या पाहून अवाक् झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) घराच्या आवारात मध्यरात्रीनंतर २.४५ वाजता बिबट्या घुसल्याचे दिसून आले. त्यानंतर ही माहिती सर्वत्र पसरली. आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीअपरात्री फिरणारा हा बिबट्या धोकादायक असून, त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. घरमालकाने ही वन विभागाला (Forest Department) पत्र लिहून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
बिबट्यांचा संचार वाढला
गोव्यात अनेक ठिकाणी बिबटे दिसून येत असून, भक्ष्य मिळवण्यासाठी ते गावात शिरतात व कुत्रे, कोंबड्या, गुरांचा फडशा पाडत असतात. काणकोण ते पेडणे पर्यंत त्यांचा संचार असतो. या बिबट्यांचा बंदोबस्त करून दिलासा देण्याची मागणी लोक करीत आहेत.